कृषी विद्यार्थ्यांसाठी कृषी मेघचा शुभारंभ

नवभारताच्या डिजिटल शेतीच्या दिशेने कृषी मेघ हे पुढचे पाऊल आहे – तोमर

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री  नरेंद्र सिंह तोमर यांनी आज कृषी मेघ (राष्ट्रीय कृषी संशोधन आणि  शिक्षण प्रणाली-क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर अँड सर्व्हिसेस) आणि केव्हीसी अल्युनेट (कृषी विश्वविद्यालय माजी छात्र नेटवर्क) आणि उच्च कृषी शैक्षणिक संस्थाना ऑनलाईन मान्यता प्रणाली   (एचईआय)सुरू केली.

नवीन शैक्षणिक धोरण  2020 च्या धर्तीवर देशातील राष्ट्रीय कृषी शिक्षण प्रणाली मजबूत करण्यासाठी आणि कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना अधिक संबंधित आणि उच्च-गुणवत्तेचे शिक्षण प्रदान करण्याच्या  उद्देशाने केंद्र सरकार -जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाची रचना करण्यात आली आहे यावर  केंद्रीय मंत्र्यांनी  भर दिला .

देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यात आणि जगभरात कुठंही सहज उपलब्ध होण्यासाठी महत्त्वपूर्ण संशोधन-आधारित माहितीचे   तत्काळ  डिजिटल पद्धतीने  जतन  करण्याची गरज तोमर यांनी व्यक्त केली.  शेतीत खासगी गुंतवणूक सक्षम करण्यावरही त्यांनी भर दिला. कृषी मेघ हे   पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या नवभारताच्या संकल्पनेतील डिजिटल शेतीच्या दिशेने उचललेलं पुढचे पाऊल आहे असे ते म्हणाले.

कृषी मेघची ठळक  वैशिष्ट्ये

  1. राष्ट्रीय कृषी संशोधन आणि शिक्षण प्रणालीच्या (एनएआरईएस) डिजिटल कृषीच्या  सेवा आणि पायाभूत  गरजा भागवण्यासाठी 2012 मध्ये उभारलेले विद्यमान डेटा सेंटर (आयसीएआर-डीसी) क्लाऊड संगणकीय पायाभूत सुविधांसह बळकट केले जाईल.
  2. आयसीएआर -डीसी आणि आयसीएआर-कृष मेघ हे घटक असलेले एनएआरईएस-क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर आणि सर्व्हिसेस ई-ऑफिस, आयसीएआर-ईआरपी ,एज्युकेशन पोर्टल, केव्हीके पोर्टल आणि मोबाइल अ‍ॅप्स, आयसीएआर संस्था संकेतस्थळे, अ‍ॅकॅडमिक मॅनेजमेंट सिस्टम, माजी विद्यार्थी पोर्टल, यूजी आणि पीजी स्तरावरचे  ई-कोर्सेस इ. सारख्या महत्वपूर्ण ऍप्लिकेशनच्या तैनातीसह एनएआरईएस प्रणालीच्या वाढत्या आयटी गरजा पूर्ण करण्यासाठी एक मजबूत आणि गतिशील व्यासपीठ उपलब्ध करतात.
  3. एनएएचईपी अंतर्गत, विद्यमान आयसीएआर डेटा सेंटरची व्याप्ती  कृषी विद्यापीठांना त्यांची संकेतस्थळे आणि आयटी उपायांसाठी होस्ट करण्यास सक्षम बनवण्यासाठी वाढवण्यात आली आहे
  4. सध्याच्या कोविड -19  परिस्थितीमध्ये, आयटी ऍप्लिकेशनच्या 24×7 उपलब्धतेमुळे घरून काम  करणे तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे  वैज्ञानिक सहकाऱ्यांशी सहकार्य  करणे शक्य झाले आहे.
  5. जोखीम कमी करण्यासाठी, ई-गव्हर्नन्सची गुणवत्ता, उपलब्धता आणि प्रवेशयोग्यता, संशोधन वाढवण्यासाठी , देशातील कृषी क्षेत्राचा विस्तार आणि शिक्षण वाढविण्यासाठी एनएएआरएम हैदराबाद येथील आयसीएआर-कृषी मेघ आयसीएआर-आयएएसआरआय नवी दिल्ली येथील आयसीएआर-डेटा सेंटरसह जोडण्यात आले आहे
  6. एनएएआरएम , हैदराबादची निवड निवडण्यात आली आहे कारण ती वेगळ्या भूकंपक्षेत्रात आहे.   हैदराबाद  योग्य आहे कारण कुशल आयटी मनुष्यबळ तसेच अनुकूल हवामानासह कमी आर्द्रता पातळी देखील उपलब्ध आहे जी डेटा सेंटर वातावरणात नियंत्रित करता येते.
  7. या नवीन केंद्रामध्ये प्रतिमा विश्लेषणाद्वारे रोग आणि कीटक ओळख, परिपक्वता ओळखणे आणि प्रतिमा विश्लेषणाद्वारे फळे पिकविणे, पशुधनातील रोग ओळखणे इत्यादी सखोल शिक्षण आधारित ऍप्लिकेशनची निर्मिती आणि ते तैनात अद्ययावत एआय / डीप लर्निंग सॉफ्टवेयर / टूल्स किट आहेत.