खरीप पिकांचे पेरणी क्षेत्र 21.2 % ने अधिक

देशात 16.07.2020 पर्यंत  308.4 मिमी सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत 338.3 मिमी पाऊस झाला. म्हणजेच  01.06.2020 ते 16.07.2020 दरम्यान  (+) 10 टक्के अधिक पाऊस झाला.  केंद्रीय जल आयोगाच्या अहवालानुसार 16.07.2020 पर्यंत देशातल्या  123 जलाशयांमध्ये उपलब्ध पाणीसाठा गेल्या वर्षीच्या याच अवधीच्या तुलनेत 150 % आणि मागील दहा वर्षांच्या सरासरी साठ्याच्या 133 टक्के आहे.

17.07.2020 पर्यंत गेल्या वर्षीच्या याच अवधीतील 570.86 लाख हेक्टर क्षेत्रफळाच्या तुलनेत यंदा 691.86 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली. अशा प्रकारे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणी क्षेत्रात  21.20 टक्के वाढ झाली आहे.

खरीप पिके अंतर्गत पेरणी क्षेत्र पुढीलप्रमाणे

शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या 142.06 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी 168.47 लाख हेक्टर क्षेत्रात भात पेरणी केली आहे. म्हणजेच पेरणी क्षेत्रात  18.59 टक्के वाढ

शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या  61.70 लाख हेक्टर  क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी 81.66 लाख हेक्टर क्षेत्रात डाळींची लागवड केली आहे , म्हणजेच लागवड क्षेत्रात 32.35 टक्के वाढ

शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या  103.00 लाख हेक्टर  क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी 115.60 लाख हेक्टर क्षेत्रात भरड धान्याची पेरणी केली आहे , पेरणी क्षेत्रात 12.23 टक्के वाढ

शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या  110.09 लाख हेक्टर  क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी 154.95  लाख हेक्टर क्षेत्रात तेलबियांची लागवड केली आहे, लागवड क्षेत्रात 40.75 टक्के वाढ

शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या 50.82  लाख हेक्टर  क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी 51.29  लाख हेक्टर क्षेत्रात ऊसाची लागवड केली आहे, लागवड क्षेत्रात  0.92 टक्के वाढ

शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या 96.35  लाख हेक्टर  क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी  113.01 लाख हेक्टर क्षेत्रात कापसाची शेती केली आहे, लागवडीच्या क्षेत्रात 17.28 टक्के वाढ  आणि ,

शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या 6.84  लाख हेक्टर  क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी  6.88 लाख हेक्टर क्षेत्रात ज्यूट आणि मेस्ताची लागवड केली आहे, लागवडीच्या क्षेत्रात  0.70 टक्के वाढ

त्यामुळे आजच्या तारखेपर्यंत खरीप पिकांच्या पेरणीतील प्रगतीवर  कोविड -19 चा कसलाही परिणाम झालेला नाही.