मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

बिहारमधील16, आसाममधील 4, उत्तर प्रदेशातील 4 आणि आंध्र प्रदेश, झारखंड ओदिशा आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एक ठिकाणी पूरस्थिती गंभीर असून नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहात आहेत आणि बिहारमध्ये 9, आसाममध्ये 9, उत्तर प्रदेशात 6, तेलंगणमध्ये 3, आंध्र प्रदेशात 2 आणि अरुणाचल प्रदेशात एक अशा 30 ठिकाणी सामान्य पूरस्थिती पेक्षा पाणी वाहात आहे. कर्नाटकमधील 13, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशातील प्रत्येकी 5, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, तेलंगण आणि झारखंड येथील प्रत्येकी 3 आणि छत्तीसगड, गुजरात आणि ओदिशामधील प्रत्येकी 1  अशा 41 बंधारे आणि धरणांमध्ये जमा होणाऱ्या पाणीसाठ्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याबाबतचा तपशील http://cwc.gov.in/sites/default/files/cfcr-cwcdfb20082020_5.pdf. या लिंकवर उपलब्ध आहे.

कृष्णा आणि तुंगभद्रा आणि भीमा यांसारख्या तिच्या उपनद्या यांच्या पाणी पातळीत सावकाश वाढ होत राहाण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या खोऱ्यातील बहुतेक धरणांमधून बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर, कर्नाटकमध्ये बागलकोट, विजयपुरा, रायचूर, बेळगाव, तेलंगणमध्ये जोगुलंबा, गडवाल आणि नालगोंडा, आंध्र प्रदेशात कुर्नुल, गुंटुर आणि कृष्णा जिल्ह्यात बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. वरील सर्व राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस अतिशय कडक दक्षता राखली जाणार आहे. धरणातून वाढणाऱ्या विसर्गावर बारकाईने लक्ष ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. या धरणांच्या प्रवाहक्षेत्रात असलेल्या भागांना आगाऊ सूचना देऊनच पाण्याचा विसर्ग करणे गरजेचे आहे.

या नद्यांवरील रेल्वे रुळ आणि रस्ते तसेच पूल यावर देखील बारीक लक्ष देण्याची गरज असून काही प्रसंग घडल्यास वाहतूक नियंत्रित करणे आवश्यक आहे. तसेच नद्यांच्या जवळ असलेल्या सखल भागातील मार्ग आणि रेल्वे रुळांवर देखील बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे. या जिल्ह्यांमध्ये मदत शिबिरांची उभारणी करत असताना सध्याच्या काळातील कोविड-19 ची स्थिती लक्षात घेऊन सर्व जिल्हा प्रशासनांनी प्रभावी उपाययोजना कराव्यात.