देशात 1.22 कोटी किसान क्रेडिट कार्डस; शेतकऱ्यांना सवलतीत कर्ज

कोविड-19 मुळे बसलेल्या धक्क्यातून उभारी मिळावी या हेतूने विशेष परिपूर्णता मोहिम राबवली जात आहे. याद्वारे किसान क्रेडिट कार्ड (KCC) द्वारे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

17.08.2020 पर्यंत 1.22 कोटी किसान क्रेडिट कार्डस मंजूर झाली आहेत. त्यांची एकूण कर्ज मर्यादा 1,02,065 कोटी रुपये आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था उभारी धरेल आणि कृषी क्षेत्राच्या विकासाला गती येईल.

आत्मनिर्भर भारत मोहिमेचाच हा एक भाग आहे असे म्हणता येईल, सरकारने 2 लाख कोटी रुपयांच्या सवलतीच्या दरातील कर्जाची सोय करण्याची घोषणा ‘आत्मनिर्भर भारत‘ अंतर्गत केली होती. एकूण 2.5 कोटी शेतकरी, मच्छीमार आणि दुग्धउत्पादकांना याचा लाभ मिळेल.