Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रात समाधानकारक प्रगती

गेल्या वर्षीच्या तुलनेत तांदूळ, डाळी, भरड धान्ये आणि तेलबियांच्या पेरणी क्षेत्रात वाढ

आणि शेतीविषयक कामांना सुलभ बनवण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहे. खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रात समाधानकारक प्रगती झाली आहे, त्याची  स्थिती खालीलप्रमाणे आहेः

खरीप पिकांचे पेरणी क्षेत्र

तांदूळ: सुमारे 220.24 लाख हेक्टर क्षेत्रावर भातशेती, गेल्या वर्षी याच कालावधीत हे क्षेत्र 187.70 लाख हेक्टर

डाळी: डाळीखालील क्षेत्र सुमारे. 99.71 लाख हेक्टर , गेल्या वर्षी याच कालावधीत हे क्षेत्र  79. 30 लाख हेक्टर

भरड धान्ये : अंदाजे 137.13 लाख हेक्टर क्षेत्रात  भरड धान्ये , गेल्या वर्षी याच कालावधीत हे क्षेत्र 120.30 लाख हेक्टर

तेलबिया: तेलबियाचे  सुमारे 166.36 लाख हेक्टर क्षेत्र , गेल्या वर्षी याच कालावधीत हे क्षेत्र  133.56 लाख हेक्टर

ऊस: ऊसाचे क्षेत्र 51.54 लाख हेक्टर , गेल्या वर्षी याच कालावधीत  हे क्षेत्र  51.02 लाख हेक्टर

जूट आणि मेस्ता: सुमारे 6.94 लाख हेक्टर क्षेत्रावर  जूट आणि मेस्ता , गेल्या वर्षी याच कालावधीत  हे क्षेत्र  6.84 लाख हेक्टर क्षेत्र

कापूस : कापसाचे सुमारे 118.03 लाख हेक्टर , गेल्या वर्षी याच कालावधीत  हे क्षेत्र 96.35 लाख हेक्टर

केंद्रीय जल आयोगाने (सीडब्ल्यूसी) अहवाल दिला आहे की,  देशातील विविध भागांमधील 123 जलाशयांमध्ये सध्याचा  पाणी साठा मागील वर्षाच्या याच  कालावधीतील पाणीसाठयाच्या 155% टक्के आहे.

रबी विपणन हंगाम  (आर.एम.एस.) 2020-21 मध्ये  भारतीय खाद्य महामंडळामध्ये  एकूण 420.90 लाख मे.टन गव्हाची आवक झाली असून त्यापैकी 389.75  लाख मे.टन गव्हाची खरेदी झाली आहे.

Exit mobile version