खरीप लागवडी खालील क्षेत्रात 7.15% ने वाढ

खरीप पिकांच्या लागवडीखालील जमिनीच्या क्षेत्रफळात समाधानकारक वाढ झाली आहे. यासंबधी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:

खरीप पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र :

28 आॉगस्ट रोजी खरीप पिकांची लागवडीखालील जमिनीचे क्षेत्रफळ 1082.22 लाख हेक्टर आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत या लागवडीखालील जमिनीचे क्षेत्रफळ 1009.98 लाख हेक्टर एवढे होते.  गेल्या वर्षीच्या तुलनेत खरीप लागवडीखालील जमिनीच्या क्षेत्रफळात 7.15% ने वाढ झाली आहे. या लागवडीचा पिकानुसार तपशील पुढीलप्रमाणे:

  • भात :  साधारणपणे 389.81 लाख हेक्टर क्षेत्रफळावर भाताची लागवड झाली आहे. गेल्या वर्षी याच मोसमात हे प्रमाण 354.41 लाख हेक्टर एवढे होते. यानुसार गेल्या वर्षीपेक्षा 35.40 लाख हेक्टर जास्त क्षेत्रफळ भाताच्या लागवडीखाली आणले गेले आहे.
  • डाळीः यावर्षी 134.57 लाख हेक्टर क्षेत्रफळ डाळींच्या लागवडीखाली आणले आहे. त्या तुलनेत गेल्या वर्षी याच मोसमात हे क्षेत्र 128.65  लाख हेक्टर एवढे होते. यानुसार डाळींच्या लागवडीखालील क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.91 लाख हेक्टर एवढी वाढ झाली आहे.
  • भरडधान्येः यावर्षी 176.89 लाख हेक्टर क्षेत्रफळ भरडधान्यांच्या लागवडीखाली आणले आहे. त्या तुलनेत गेल्या वर्षी याच मोसमात हे क्षेत्र 172.49 लाख  हेक्टर एवढे होते. यानुसार 4.40 लाख हेक्टर जास्त क्षेत्रफळ यावर्षी भरडधान्यांच्या लागवडीखाली आणले गेले आहे.
  • तेलबिया: यावर्षी 193.29 लाख  हेक्टर क्षेत्रफळ तेलबियांच्या लागवडीखाली आणले गेले आहे. त्या तुलनेत गेल्या वर्षी याच मोसमात हे क्षेत्र 170.99 लाख हेक्टर एवढे होते. याप्रमाणे 22.30 लाख हेक्टर एवढे जास्त क्षेत्रफळ यावर्षी तेलबियांच्या  लागवडीखाली आणले गेले आहे.
  • ऊस : यावर्षी 52.29 लाख हेक्टर क्षेत्रफळ उसाच्या लागवडीखाली आणले गेले आहे. त्या तुलनेत गेल्या वर्षी याच मोसमात हे क्षेत्र 51.68 लाख हेक्टर एवढे होते. म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी 0.61 लाख जास्त क्षेत्र उसाच्या लागवडीखाली आणले गेले आहे.
  • ताग आणि अंबाडी : यावर्षी 6.97 लाख हेक्टर क्षेत्रफळ ताग आणि अंबाडी लागवडीखाली आणले आहे. त्या तुलनेत गेल्या वर्षी याच मोसमात हे क्षेत्र 6.86 लाख हेक्टर एवढे होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत 0.11 लाख हेक्टर जास्त क्षेत्र ताग आणि अंबाडी लागवडीखाली आणले आहे.
  • कपास : यावर्षी 128.41 लाख हेक्टर क्षेत्रफळ कपाशीच्या लागवडीखाली आणले आहे. त्या तुलनेत गेल्या वर्षी याच मोसमात हे क्षेत्र 124.90 लाख हेक्टर एवढे होते. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.50 लाख जास्त क्षेत्र कपास लागवडीखाली आणले गेले आहे.

केंद्रीय जल आयोगाच्या (CWC)  अहवालानुसार देशाच्या विविध भागातील 123 वापर योग्य जलसाठ्य़ातील जलाचे प्रमाण हे गेल्या वर्षी याच कालावधीत असणाऱ्या जलसाठ्याच्या तुलनेत 102% एवढे आहे.