मागील तीन चार वर्षांपासून आपल्या 4जी सेवेने भारतीय टेलिकॉम क्षेत्रात खळबळ निर्माण करणाºया रिलायन्स जिओने या क्षेत्रात आता एक पाऊल पुढे टाकायचे ठरवले आहे. पुढील वर्षी जिओ भारतात 5 जी इंटरनेट सेवा सुरू करणार असून त्यामुळे शेतीसह विविध क्षेत्रांत क्रांती होण्याची शक्यता आहे.
रिलायन्सच्या त्रेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी ही घोषणा केली. त्यासाठी लागणारे सर्व तंत्रज्ञान भारतीय असणार आहे. दरम्यान अलिकडेच लॉकडाऊनच्या काळातही अनेक गुंतवणूक दारांनी जीओमध्ये गुंतवणूक केली होती.
Welcome to the first ever virtual AGM of Reliance Industries Limited; 43rd Annual General Meeting post-IPO.#RILAGM #nayeindiakanayajosh https://t.co/BfJMM6L8A5
— Reliance Jio (@reliancejio) July 15, 2020
आगामी काळात गुगलही जिओमध्ये गुंतवणूक करणार असून आगामी काळात ही गुंतवणूक तब्बल 33 हजार 737 कोटींची असणार आहे, अशी माहितीही अंबानी यांनी यावेळी दिली.
दरम्यान रिलायन्सने तंत्रज्ञानात आणखी एक पाऊल पुढे टाकत गुगल ग्लासच्या धर्तीवर जिओ ग्लास या थी्र डी चष्म्याची सेवा सुरू करण्याची घोषणाही केली. पुढील वर्षी 5 जी तंत्रज्ञान आल्यानंतर या चष्म्याचा वापर करता येईल. शिक्षणासह अनेक क्षेत्रात या चष्म्याचा वापर करता येणार आहे.