Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

देशात सक्रीय रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

रुग्ण बरे होण्याच्या राष्ट्रीय सरासरी दरापेक्षा 19 राज्यांतील दर जास्त

कोविड-19 च्या संक्रमणाला आळा घालणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी हाती घेतलेल्या सक्रीय, पूर्वदक्षतापूर्ण आणि समन्वयीत प्रयत्नांमुळे कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हळूहळू वाढते आहे.

चाचण्यांचे प्रमाण वाढवणे आणि वेळेत निदान यामुळे, सौम्य लक्षणे असतांनाच कोविड बाधित रूग्ण ओळखणे शक्य झाले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची कठोर अंमलबजावणी, सर्वेक्षण यामुळे. संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आहे.

लक्षणविरहित किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांना गृह विलगीकरणात, ऑक्सिमीटरचा वापर करुन त्यांच्यावर लक्ष ठेवल्याने रुग्णालयांवरील भार बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे.

अशा वर्गीकृत धोरणांमुळे आणि सर्वसमावेशक दृष्टीकोनामुळे गेल्या 24 तासांत कोविडचे 18,850 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे आतापर्यंत, बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 5,53,470 इतकी झाली आहे.

आज देशातील रुग्ण बरे होण्याचा दर आणखी सुधारुन 63.02% पर्यंत पोहोचला. 19 राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर राष्ट्रीय सरासरी दराच्या तुलनेत अधिक आहे.

 ही राज्ये खालीलप्रमाणे:-

 राज्ये/केंद्रशासित प्रदेश रुग्ण बरे होण्याचा दर राज्ये/केंद्रशासित प्रदेश रुग्ण बरे होण्याचा दर
लद्दाख 85.45% त्रिपुरा 69.18%
दिल्ली 79.98% बिहार 69.09%
उत्तराखंड 78.77% पंजाब 68.94%
छत्तीसगड 77.68% ओडिशा 66.69%
हिमाचल प्रदेश 76.59% मिझोराम 64.94%
हरियाणा 75.25% आसाम 64.87%
चंदिगढ 74.60% तेलंगणा 64.84%
राजस्थान 74.22% तामिळनाडू 64.66%
मध्य प्रदेश 73.03% उत्तर प्रदेश 63.97%
गुजरात 69.73%    

 

सध्या देशभरात 3,01,609 सक्रीय रूग्णांवर कोविड रूग्णालये, केअर सेन्टर्स किंवा घरी उपचार सुरु आहेत. देशात सक्रीय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2,51,861 ने अधिक आहे.

गंभीर रुग्णांच्या उपचारपद्धतीत सुधारणा केल्यामुळे रुग्णांचा मृत्यूदर देखील 2.64%पर्यंत कमी झाला आहे. राष्ट्रीय टेलीकम्युनिकेशन सेंटर्सच्या माध्यमातून दिल्ली एम्स समर्पित कोविड रूग्णांना सातत्याने मार्गदर्शन करत आहे.खालील 30 राज्यांमध्ये कोविड मृत्यूदर राष्ट्रीय सरासरी दरापेक्षा कमी आहे.

 

राज्ये/केंद्रशासित प्रदेश मृत्यूदर राज्ये/केंद्रशासित प्रदेश मृत्यूदर
मणिपूर 0% झारखंड 0.8%
नागालँड 0% बिहार 0.86%
दादरा नगरहवेली- दीव दमण 0% हिमाचल प्रदेश 0.91%
मिझोराम 0% तेलंगणा 1.03%
अंदमान-निकोबार बेटे 0% आंध्र प्रदेश 1.12%
सिक्कीम 0% पुद्दुचेरी 1.27%
लद्दाख 0.09% उत्तराखंड 1.33%
त्रिपुरा 0.1% तामिळनाडू 1.42%
आसाम 0.22% हरियाणा 1.42%
केरळ 0.39% चंदिगढ 1.43%
छत्तीसगड 0.47% जम्मू-कश्मीर 1.7%
ओडिशा 0.49% कर्नाटक 1.76%
अरुणाचल प्रदेश 0.56% राजस्थान 2.09%
गोवा 0.57% पंजाब 2.54%
मेघालय 0.65% उत्तर प्रदेश 2.56%

गेल्या 24 तासांत देशात 2,19,103 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. आतापर्यंत एकूण 1,18,06,256 चाचण्या करण्यात आल्या आहेत. प्रती दशलक्ष लोकसंख्येच्या तुलनेत चाचण्यांचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. आता हे प्रमाण 8555.25 इतके आहे .

देशातील चाचण्यांची क्षमता आणखी वाढवण्यात आली असून आता 1200 प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. त्यापैकी 852  सरकारी तर 348 खाजगी प्रयोगशाळा आहेत.

Exit mobile version