Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

रुग्ण बरे होण्याचा दर 72% च्या वर

एकूण रुग्ण बरे होण्याचा आकडा लवकरच 2 दशलक्षचा टप्पा पार करणार

भारतात कोविड-19चे रुग्ण बरे होण्याच्या दरात निरंतर वृद्धी होत आहे. आज, गेल्या 24 तासात देशात कोविड-19चे सर्वाधिक 57,584 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

या कामगिरीमुळे देशातील कोविड-19चे रुग्ण बरे होण्याचा दर 72% च्या पार पोहोचण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. प्रभावी रोग नियंत्रण धोरणाची यशस्वी आणि समन्वित अंमलबजावणी, जलद आणि सर्वसमावेशक चाचणी व गंभीर रूग्णांच्या प्रमाणित नैदानिक व्यवस्थापनाचा हा सकारात्मक परिणाम आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल (एमओएचएफडब्ल्यू) मध्ये स्पष्टपणे नमूद केल्यानुसार, सौम्य, मध्यम व गंभीर स्वरूपाच्या कोविड-19 रुग्णांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणासाठी भारताने केअर प्रोटोकॉलचे अनुसरण केले आहे. प्रभावी क्लिनिकल व्यवस्थापन धोरणाचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

अधिक संख्येने रुग्ण बरे होत असल्यामुळे आणि त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात येत आहे तसेच गृह अलगीकरणाचा (सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेले) कालावधी पूर्ण करणाऱ्या रुग्णांमुळे, भारतातील कोविड-19च्या बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा जवळपास 2 दशलक्ष (19,19,842) पर्यंत पोहोचला आहे. बरे होणारे रुग्ण आणि सक्रीय रुग्णांमधील अंतर वाढत आहे हे याने सुनिश्चित झाले आहे. हा आकडा आज 12,42,942 इतका आहे.

देशातील सक्रीय रुग्णांचा आकडा (आजच्या तारखेला 6,76,900) कमी झाला असून सध्याच्या कोविड बाधित रुग्णांच्या केवळ 25.57% इतकाच आहे. रुग्णांची लवकर ओळख पटल्याने सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना वेळेवर आणि त्वरित अलगीकरण सुविधा प्रदान करण्यात आणि गंभीर स्वरुपाची लक्षणे असलेल्या रुग्णांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात मदत झाली ज्यामुळे रुग्णांचे वेळेवर आणि प्रभावी व्यवस्थापन झाले. देशातील कोविड-19 च्या रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण कमी होऊन आज ते 1.92% वर पोहोचले आहे.

Exit mobile version