Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

किसान सन्मान योजना; कृषी मंत्र्यांनी केली महत्त्वाची घोषणा

देशातील शेतकर्‍यांना दरवर्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 1 डिसेंबर 2019 पासून आधार आवश्यक झाला आहे. दोन हजार रुपयांप्रमाणे ही रक्कम तीन टप्प्यात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारांनी निवडलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होते.

लोकसभेत तोमर यांनी म्हटले, की पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या निधीत वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.  शेतकरी कुटुंबांना अशा परिस्थितीत पूर्वीप्रमाणे वर्षाकाठी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. महाराष्ट्रात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अपात्र शेतकऱ्यांकडून या रकमेची वसूली करण्यात आल्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना तोमर म्हणाले, की यंदा 11 मार्चला तब्बल 78.37 कोटी रुपयांची वसुली केंद्र सरकारने केली आहे.

योजनेचा लाभ कसा घ्यावा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत.
1. आधार कार्ड
2. अद्ययावत केलेले बॅँक खाते
3. पासपोर्ट आकाराचे फोटो
4. रहिवासाचा पत्ता सांगणारे कागदपत्र
5. जमिनीची कागदपत्रे

सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर पीएम किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in/ संकेतस्थळावर जाऊन उजव्या बाजूला दिलेल्या रकान्यावर क्लिक करून माहिती भरा. या संकेतस्थळावरील मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करूनही ही माहिती भरता येईल.

पी.एम.किसान योजना

खालील व्यक्ती या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार नाहीत

1.सर्व संस्थात्मक जमीनधारक
2.खालीलपैकी एक किंवा अधिक श्रेणीशी संबंधीत शेतकरी कुटूंब
i) संवैधानिक पद धारण करणारे/ केलेले आजी व माजी व्यक्ती.
ii) आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/ माजी खासदार/राज्यसभा सदस्य, आजी/माजी विधानसभा/विधान परीषद सदस्य, आजी/माजी महानगरपालीकेचे महापौर, आजी/माजी जिल्हा परीषदेचे अध्यक्ष.
iii) केंद्र व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी/ कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अखत्यारीतील कार्यालयांमधील आणि स्वायत्त संस्थांचे सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नियमीत अधिकारी/कर्मचारी.
चतुर्थश्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळून
vi)सर्व निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रू. १०,०००/- किंवा त्यापेक्षा जास्त आहे
चतुर्थश्रेणी / गट ड वर्ग कर्मचारी वगळून
v) मागील वर्षात आयकर भरलेल्या सर्व व्यक्ती.
vi) नोंदणीकृत व्यवसायिक डॉक्टर, वकील, अभियंता, सनदी लेखापाल (C.A), वास्तुशास्त्रज्ञ, इ. क्षेत्रातील व्यक्ती.

Exit mobile version