लासलगावपेक्षा जुन्नर बाजारसमितीत कांद्याला सर्वाधिक 12 हजारांचा दर

आज पुणे जिल्ह्यातील जुन्नर बाजारसमितीत कांद्याला जास्तीत जास्त प्रतिक्विंटल दर 12 हजारांवर मिळाला, तर सरासरी दर साडेआठ हजारापर्यंत राहिले. त्याखालोखाल राहता बाजारसमितीत सुमारे दहा हजार जास्तीत जास्त दर मिळाला.

कांद्याची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या लासलगाव येथे आज जास्तीत जास्त दर 7800 रुपये प्रतिक्विंटल, तर सर्वसाधारण 7 हजार रुपये प्रतिक्विंट होता. चार ते पाच दिवसांपूर्वी लासलगावच्या काही बड्या कांदा व्यापाºयांवर आयकर विभागाने छापे टाकल्याने व्यापाºयांनी लिलाव बंद केले होते. मात्र शेतकºयांनी जवळ असलेल्या विंचूर, देवळा, सायखेडा, येवला बाजारसमितीत कांदा विक्री करणे पसंत केले. सध्या येथील लिलाव पूर्ववत सुरू असले, तरी पिंपळगाव, देवळा, दिंडोरी पेक्षा कमी बाजारभाव शेतकºयांना आज मिळाला.

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे आज कांदद्याचा जास्तीत जास्त भाव 8100 होता, तर सरासरी भाव 8 हजार रुपये प्रति क्विंटल होता, तर दिंडोरी-वणी आणि देवळा येथेही चांगला दर होता.

(टिप : आज कांद्याला मिळालेल्या दराची माहिती महाराष्टÑ राज्य पणन मंडळाने त्यांच्या संकेतस्थळावर जारी केली असून त्या आधारे आजची ही बाजारभावांची माहिती दिली आहे. ती संबंधित बाजारसमितीत झालेल्या आवकेनुसार आहे. शेतकºयांनी पुढील व्यवहार करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी बाजारभावांची योग्य ती खात्री करूनच व्यवहार करावा.)

आजचे कांदा दर

शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

20/10/2020
कोल्हापूर क्विंटल 2187 2500 8000 5000
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 5784 5000 8500 6750
सातारा क्विंटल 56 2000 7000 4500
मोर्शी क्विंटल 18 4000 5000 4500
नांदूरा क्विंटल 17 1550 4200 4200
जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 6041 4510 12110 8510
कराड हालवा क्विंटल 99 3000 6500 6500
सोलापूर लाल क्विंटल 10614 500 10000 3500
पंढरपूर लाल क्विंटल 1001 100 8500 4000
नागपूर लाल क्विंटल 1500 4000 5500 5125
सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 1250 2000 8200 5000
पुणे लोकल क्विंटल 10267 2000 8200 5100
पुणे- खडकी लोकल क्विंटल 19 2000 7000 4500
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 5 4800 5000 4900
पुणे-मांजरी लोकल क्विंटल 26 2200 5000 3300
पुणे-मोशी लोकल क्विंटल 65 1800 6000 3900
मलकापूर लोकल क्विंटल 80 2500 5800 5425
नागपूर पांढरा क्विंटल 1082 4000 5500 5125
येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 2000 1500 8250 6700
नाशिक उन्हाळी क्विंटल 741 3250 7050 5250
लासलगाव उन्हाळी क्विंटल 7370 1901 7812 7100
मालेगाव-मुंगसे उन्हाळी क्विंटल 5000 3005 6805 5950
राहूरी उन्हाळी क्विंटल 11409 500 7500 6000
चांदवड उन्हाळी क्विंटल 4400 1900 7000 6100
मनमाड उन्हाळी क्विंटल 2000 2000 6555 6100
सटाणा उन्हाळी क्विंटल 5015 2100 8325 6950
कोपरगाव उन्हाळी क्विंटल 3812 2000 7373 6900
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 11815 2001 8180 7000
पिंपळगाव(ब) – सायखेडा उन्हाळी क्विंटल 2461 1100 6900 6300
दिंडोरी-वणी उन्हाळी क्विंटल 1230 6000 8570 7300
देवळा उन्हाळी क्विंटल 3775 5000 8000 7000
राहता उन्हाळी क्विंटल 2539 2000 10500 6950
उमराणे उन्हाळी क्विंटल 11500 1700 8500 6500