हिट अँड रन अपघातांतील पीडितांना नुकसान भरपाई देण्याबाबतची अधिसूचना जारी

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहनांच्या हिट अँड रन अपघातांतील पीडितांना नुकसानभरपाई देण्यासाठी नवी योजना अधिसूचित केली आहे. मंत्रालयाने गंभीररीत्या जखमी झालेल्यांसाठी आता साडेबारा हजार रुपयांची नुकसानभरपाई वाढवून 50,000 करण्यासाठी आणि अशा अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या निकटवर्तीयांना 25,000 ऐवजी 2 लाख रुपये इतकी  वाढीव नुकसानभरपाई देण्यासाठी 25 फेब्रुवारी 2022 रोजी अधिसूचना जारी केली आहे. नुकसानभरपाई मिळविण्यासाठीची अर्ज प्रक्रिया आणि पीडितांना प्रत्यक्ष भरपाई मिळणे या संपूर्ण प्रक्रियेसाठी कालमर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे. आता 1 एप्रिल 2022 पासून जुन्या भरपाई योजना 1989 ऐवजी ही नवी योजना लागू होणार आहे.

मंत्रालयाने मोटार वाहनांच्या अपघात निधीची उभारणी , परिचालन, निधीचे स्रोत इत्यादींसाठी देखील 25 फेब्रुवारी 2022 रोजी काही नियम जाहीर केले आहेत. हा निधी हिट अँड रन अपघातांतील पीडितांना नुकसानभरपाई देण्यासाठी, जखमींच्या उपचारासाठी आणि केंद्र सरकारने विहित केलेल्या इतर तत्सम कारणांसाठी वापरला जाईल.

हिट अँड रन अपघातांतील पीडितांना वाढीव नुकसानभरपाईची अधिसूचना, अंमलबजावणी तसेच मोटार वाहन अपघात निधी यासंदर्भात तपशील जाणून घेण्यासाठी कृपया खालील लिंक्सचा वापर करा.

GSR 163(E)Compensation to Victims of Hit & Run Motor Accidents, Scheme 2022

SO 859(E)_Implementation of Section 50-57 and 93 of MV(A) Act, 2019

GSR162(E)_Motor Vehicles (Accident) Fund Rules, 2022