शेतकरी मित्रानो, सध्या पेट्रोलचे भाव शंभरीपार आहेत, त्यामुळे प्रत्येकाला वाटत की आपल्या गाडीने चांगला अँव्हरेज द्यावा. कुठल्याही क्षणी बाईक काढावी आणि मस्त दूरवर फिरून यावं आणि ते पण पेट्रोलचा विचार न करता.
म्हणून या काही खास टिप्स ज्या नक्कीच तुमच्या बाईक चा अँव्हरेज वाढवण्यास मदत करतील.
१) वेळच्या वेळी बाईकचे सर्व्हिसिंग आणि साफसफाईकडे लक्ष ठेवा.
२) गाडीत पेट्रोलचा पुरेसा साठा असायला हवा.
३) वजनदार बाईकला जास्त पेट्रोल लागत. त्यामुळे बाईक स्लिम अँड ट्रिम ठेवा.
४) चांगलं मायलेज मिळण्यासाठी टायरमधलं हवेचं प्रेशर योग्य ठेवा. टायर सुस्थितीत नसतील तर अँव्हरेज कमी होईल .
५) वेळोवेळी डिफ्युजर पाईपमध्ये साठलेला कार्बन स्वच्छ करा. यामुळेही मायलेज वाढायला मदत होईल.
६) नेहमी इंजिन ल्युब्रिकंट्सचा वापर करा. यामुळे इंजिनची कार्यक्षमता वाढून काळानुरूप होणारी झीज कमी होते आणि मायलेजही वाढतं.
७) एकाच वेगात गाडी चालवा. एकदम जोरात किंवा एकदम हळू गाडी चालवू नका.
८) सारखे सारखे क्लच दाबू नका.