Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.21%

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 10,423 नवे दैनंदिन रुग्ण

भारतात गेल्या 24 तासात  52,39,444  कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या मात्रा, देण्यात आल्या असून आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण 106.85 कोटीपेक्षा अधिक (1,06,85,71,879)  मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,07,33,024 सत्रांद्वारे  मात्रा देण्यात आल्या  आहेत.

सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढील प्रमाणे आहे-

 

HCWs

1st Dose 1,03,79,238
2nd Dose 92,33,414
 

FLWs

1st Dose 1,83,71,868
2nd Dose 1,59,56,217
 

Age Group 18-44 years

1st Dose 42,04,89,326
2nd Dose 14,45,67,423
 

Age Group 45-59 years

1st Dose 17,53,42,269
2nd Dose 9,71,44,220
 

Over 60 years

1st Dose 11,00,17,665
2nd Dose 6,70,70,239
Total 1,06,85,71,879

गेल्या 24 तासात 15,021 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून (महामारीच्या सुरवातीपासून) कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,36,83,581 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.

परीणामी कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर  98.21% झाला आहे.

सलग  128 दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

गेल्या  24 तासात 10,423 नव्या रूग्णांची नोंद झाली.

सध्या सक्रीय रुग्ण संख्या 1,53,776 इतकी असून ही  संख्या गेल्या 250  दिवसातली  सर्वात कमी आहे. देशात सक्रीय  रुग्णांची संख्या  एकूण उपचाराधीन  रुग्णांच्या 0.45% इतकी असून मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.

देशभरात चाचण्या  करण्याच्या क्षमतेत वाढ सुरुच आहे. देशात गेल्या 24 तासात 10,09,045 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 61.02 कोटीहून अधिक  (61,02,10,339) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 1.16%  असून गेले  39 दिवस 2% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.03% असून गेले 29 दिवस 2% पेक्षा कमी आणि 64 दिवस  3% पेक्षा कमी आहे.

Exit mobile version