Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

भारताचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर जवळपास 97 टक्के

23.5 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना कोविड-19 प्रतिबंधक लस देण्यात आली

रुग्ण बरे होण्याच्या एकूण संख्येत सातत्याने वाढ होत असून, भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर आता जवळपास 97 टक्के झाला असून  जागतिक स्तरावरील उच्चांकी दरांपैकी हा एक दर आहे.

1,03,73,606  लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 14,301 रूग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

भारताची एकूण उपचाराधीन रुग्णांची संख्या आज 1.75 लाख (1,73,740) पेक्षा कमी झाली आहे. उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण आता भारताच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या केवळ 1.62 टक्के इतके आहे.

सक्रिय रुग्णांमध्ये  सतत घसरण होण्याचा राष्ट्रीय कल कायम ठेवत, 31 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्येही सक्रिय रुग्णसंख्या  5,000 पेक्षा कमी नोंदली गेली आहे.

78 टक्के सक्रिय रुग्ण  केरळ, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल  या पाच राज्यांमध्ये आहेत

28 जानेवारी,  2021 रोजी सकाळी साडेसात वाजेपर्यंत 23.5  लाखांहून अधिक (23,55,979) लाभार्थ्यांना देशव्यापी कोविड-19 लसीकरण मोहिमे अंतर्गत लस देण्यात आली आहे.

गेल्या 24 तासात 6,102 सत्रांमध्ये 3,26,499 लोकांचे  लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत 42,674 सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.

S. No. State/UT Beneficiaries vaccinated
1 A & N Islands 2,385
2 Andhra Pradesh 1,63,727
3 Arunachal Pradesh 7,307
4 Assam 19,945
5 Bihar 89,074
6 Chandigarh 2,355
7 Chhattisgarh 51,647
8 Dadra & Nagar Haveli 345
9 Daman & Diu 320
10 Delhi 39,764
11 Goa 2,311
12 Gujarat 94,524
13 Haryana 1,09,782
14 Himachal Pradesh 14,054
15 Jammu & Kashmir 16,331
16 Jharkhand 24,020
17 Karnataka 2,67,811
18 Kerala 82,970
19 Ladakh 818
20 Lakshadweep 746
21 Madhya Pradesh 1,31,679
22 Maharashtra 1,79,509
23 Manipur 2,855
24 Meghalaya 3,249
25 Mizoram 6,142
26 Nagaland 3,973
27 Odisha 1,78,227
28 Puducherry 1,813
29 Punjab 44,708
30 Rajasthan 2,37,137
31 Sikkim 1,320
32 Tamil Nadu 82,039
33 Telangana 1,30,425
34 Tripura 19,698
35 Uttar Pradesh 1,23,761
36 Uttarakhand 14,690
37 West Bengal 1,58,193
38 Miscellaneous 46,325
Total 23,55,979

काल बरे झालेल्या रुग्णांपैकी 77.84% रुग्ण 7 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत

केरळमध्ये काल 5,006 इतक्या सर्वाधिक संख्येने रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात  2,556 रुग्ण बरे झाले आणि त्याखालोखाल  कर्नाटकमध्ये 944 रुग्ण बरे झाले.

गेल्या 24 तासांत 11,666  नवीन रुग्णांची नोंद झाली.

नवीन रुग्णांपैकी 81.96  टक्के रुग्ण  6 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.

केरळमध्ये  5,659 इतक्या  सर्वाधिक संख्येने नवीन रुग्ण आढळले आहेत.  त्याखालोखाल महाराष्ट्रात 2,171 आणि तामिळनाडूमध्ये 512 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासांत 123 मृत्यूची नोंद झाली.

काल झालेल्या मृत्यूंपैकी 75.61 टक्के रुग्ण सात राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.  महाराष्ट्रात सर्वाधिक (32) मृत्यू झाले आहेत. केरळमध्ये 20 तर  पंजाबमध्ये 10 जणांचा काल मृत्यू झाला.

Exit mobile version