भारतीय रेल्वे मागणीनुसार रेल्वे गाड्या सुरू ठेवणार

एकूण 5381 उपनगरीय आणि 836 प्रवासी रेल्वे सेवा कार्यरत

भारतीय रेल्वे, मागणीनुसार रेल्वे सेवा पुरवणे सुरू ठेवणार आहे. सध्या भारतीय रेल्वेच्या प्रतिदिन सुमारे 1402 विशेष रेल्वे सेवा सुरू आहेत. एकूण पाच हजार 381 उपनगरी रेल्वे सेवा आणि 830 प्रवासी रेल्वे सेवा सुद्धा सुरू आहेत. याशिवाय, विशेष मागणीनुसार 28 क्लोन रेल्वे गाड्याही सुरू आहेत.

एकूण 5381 उपनगरीय रेल्वे सेवा आणि 836 पॅसेंजर प्रवासी रेल्वे सुरू आहेत. याशिवाय गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या सुमारे 58 रेल्वे (29 जोड्या) आणि पश्चिम रेल्वेच्या 60 गाड्या (30 जोड्या) एप्रिल-मे 2021 मध्ये सुरू करण्यात  येणार आहेत.   गोरखपुर, पटना, दरभंगा, वाराणसी,गुवाहाटी, बरौनी प्रयागराज, रांची व लखनौ इत्यादी जास्त मागणी असणाऱ्या गंतव्य स्थानांसाठी या गाड्या सोडण्यात येतील.