Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

भारतात गेल्या 24 तासांत 1.34 लाख दैनंदिन नवीन रुग्णसंख्येची नोंद

सलग 21 व्या दिवशी दैनंदिन बरे होणाऱ्यांची संख्या दैनंदिन नवीन रुग्णांच्या तुलनेत अधिक

भारतात गेल्या 24 तासांत 1,34,154 दैनंदिन नवीन रुग्णसंख्येची नोंद झाली.

देशात सलग सातव्या दिवशी 2 लाखांपेक्षा कमी दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. केंद्र आणि राज्य तसेच केंद्रशासित प्रदेश यांच्या शासनांनी मिळून एकत्रितपणे केलेल्या परीश्रमांमुळे हा परिणाम साध्य झाला आहे.

भारतात सक्रीय रुग्णांच्या संख्येत सतत घसरण होत असल्याचे दिसून येत आहे. आज 17,13,413 सक्रीय रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात सक्रिय रूग्णसंख्येत एकूण 80,232  इतकी घसरण झाली. आता देशातील सक्रीय रुग्ण संख्या एकूण बाधित रुग्णांच्या 6.02% आहे.

दैनंदिन बरे झालेल्यांची संख्या दैनंदिन नवीन रुग्णांच्या तुलनेत सलग 21व्या दिवशी अधिक आहे. गेल्या 24 तासांत 2,11,499 जण बरे झाल्याची नोंद झाली आहे.

दैनंदिन नवीन रुग्णांच्या तुलनेत गेल्या 24 तासांत 77,345  हून अधिक रूग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे.

या महामारीची लागण झाल्यापासून, संसर्ग झालेल्या लोकांपैकी 2,63,90,584 नागरिक कोविड-19 या आजारातून बरे झाले आहेत आणि गेल्या 24 तासांत 2,11,499 रूग्ण बरे झाले आहेत. एकूण रूग्ण बरे होण्याचा दर 92.79%,इतका आहे, जो सातत्याने वाढता कल दर्शवित आहे.

गेल्या 24 तासात एकूण 21,59, 873 चाचण्या करण्यात आल्या आणि आतापर्यंत भारताने एकूण 35.3 कोटी ( 35,37,82,648) चाचण्या पूर्ण केल्या आहेत.

देशभरात एकीकडे चाचण्या करण्याचे प्रमाण वाढत आहे, तसेच साप्ताहिक पॉझिटिव्हिटीच्या दरात सतत घट दिसून येत आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटीचा दर सध्या 7.66% आहे तर दैनंदिन पॉझिटिव्हिटीचा दर कमी झाला असून  तो आज 6.21% वर आहे. सलग दहा दिवस तो 10% पेक्षा कमी आहे.

राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आज देशभरात एकूण संख्या 22.10 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण 22,10,43,693 लसीच्या मात्रा 31,24,981 सत्रांद्वारे दिल्या गेल्या आहेत.

त्या पुढील आलेखात समाविष्ट आहेत

HCWs 1st Dose 99,12,522
2nd Dose 68,15,468
FLWs 1st Dose 1,58,49,178
2nd Dose 85,84,162
Age Group 18-44 years 1st Dose 2,26,12,866
2nd Dose 59,283
Age Group 45 to 60 years 1st Dose 6,78,84,028
2nd Dose 1,09,73,523
Over 60 years 1st Dose 5,94,06,566
2nd Dose 1,89,46,097
Total 22,10,43,693

S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar

Exit mobile version