भारतात गेल्या 24 तासांत 31,443 नव्या रुग्णांची नोंद

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 38.14 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या. भारतात गेल्या 24 तासांत 31,443 नव्या रुग्णांची नोंद झाली; ही संख्या गेल्या 118 दिवसांतील सर्वात कमी संख्या आहे.

कोविड-19 बाबत अद्ययावत स्थिती

  • देशभरात आतापर्यंत एकूण 3,00,63,720 कोटी पेक्षा अधिक जण बरे झाले
  • रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 97.28%
  • गेल्या 24 तासांत 49,007 जण बरे झाले
  • देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,31,31, गेल्या109 दिवसांतील ही सर्वात कमी संख्या आहे
  • उपचाराधीन रुग्णसंख्या एकूण रुग्णांच्या 1.40%
  • साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर 5% पेक्षा कमी असून, सध्या तो 2.28 % इतका आहे
  • दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 1.81% असून सलग 22  दिवसांपासून हा दर 3% हून कमी
  • देशात कोविड चाचण्यांची क्षमता लक्षणीयरित्या वाढलेली आहे- आतापर्यंत एकूण 43.40 कोटी चाचण्या करण्यात आल्या

कोविड – 19 लसीकरणाची सद्यस्थिती

आत्तापर्यंत सर्व स्रोतांच्या माध्यमांतून राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना 39.46 कोटींपेक्षा अधिक (39,46,94,020) लसींच्या मात्रा पुरविण्यात आल्या आहेत आणि पुढील 12 लाख मात्रांचे नियोजन करण्यात आले आहे.

यापैकी वाया गेलेल्या मात्रा धरून आतापर्यंत  एकूण 37,55,38,390 मात्रा वापरल्या गेल्या आहेत. (आज सकाळी 8 वाजता उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार)

राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडे आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 1.91 कोटींहून  अधिक (1,91,55,630) मात्रांचा साठा उपलब्ध आहे.