सलग दोन आठवडे सक्रिय रूग्णांची संख्या 10 लाखांपेक्षा कमी
कोविड-19 महामारीचा भारत अतिशय प्रभावी सामना करीत आहे. रूग्णांची संख्या कमी राखण्यात भारताने महत्वाचा टप्पा ओलांडला आहे. भारतामध्ये सलग दोन आठवडे म्हणजेच 14 दिवस 10 लाखांपेक्षा कमी सक्रिय रूग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या दोन आठवड्यापासून दररोज 10 लाखांपेक्षा कमी संख्येने सक्रिय रूग्णांची नोंद होत आहे,
केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या ‘टेस्ट-ट्रॅक-ट्रीट’ या रणनीतीचा आणि तंत्राचा वापर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश करीत आहेत. देशभरामध्ये कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविल्यामुळे रूग्णांची ओळख लवकर होत आहे. तसेच रूग्णांवर पुढील उपचार करण्यासाठी तातडीने उपाय योजना केली जात आहे. केंद्र सरकारने उपचाराची कार्यपद्धती निश्चित केली असल्यामुळे त्याप्रमाणेच सार्वजनिक आणि खाजगी रूग्णालयांमध्ये तसेच आरोग्य सुविधा केंद्रांमध्ये ‘एसटीपी’ प्रमाणित उपचार कार्यपद्धतीचे पालन करीत उपचार करण्यात येत आहे.
देशामध्ये गेल्या 24 तासांत 76,737 कोरोनारूग्ण बरे झाल्याची नोंद आहे. तर देशामध्ये नवीन 74,442 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. अलिकडच्या दिवसात नवीन कोरोनारूग्ण संख्येपेक्षा बरे होत असलेल्या रूग्णांची संख्या जास्त असते.
भारतामधील बरे झालेल्या एकूण रूग्णांची संख्या 55,86,703 आहे.
एका दिवसाचे बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे रूग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर सध्या 84.34 टक्के आहे.
नव्याने बरे झालेल्यांपैकी 75टक्के रूग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधले आहेत. यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर असून एकट्या महाराष्ट्रातले 15हजारांपेक्षा जास्त रूग्ण बरे झाले आहेत. त्याखालोखाल कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांचा क्रमांक लागतो. या राज्यांमधले प्रत्येकी 7000 पेक्षा जास्त रूग्ण बरे झाले आहेत.
देशात आज सक्रिय रूग्णांची संख्या 9,34,427 आहे. सक्रिय रूग्णांचे प्रमाण 14.11 टक्के आहे. हे प्रमाण घटत आहे.
10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सक्रिय रूग्णांचे प्रमाण 77 टक्के आहे.
गेल्या 24 तासामध्ये देशात एकूण 74,442 नवीन लोकांना कोरोना झाला.
यापैकी 78 टक्के रूग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले आहेत. महाराष्ट्रामध्ये 12,000पेक्षा जास्त रूग्ण आढळले आहेत. तर कर्नाटकमध्ये नवीन 10,000पेक्षा जास्त रुग्ण आढळले.
गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे 903 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 82 टक्के रूग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले आहेत.
कोविडमुळे महाराष्ट्रातल्या 326 जणांना काल मृत्यू झाला हे प्रमाण 36 टक्के आहे. त्याखालोखाल कर्नाटकातल्या 67 जणांना मृत्यू झाला.