Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

भारताने 13 कोटीपेक्षा अधिक लसीच्या मात्रा देऊन महत्वाचा टप्पा ओलांडला

जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून देशभरात देण्यात आलेल्या कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या मात्रांची एकूण संख्या आज 13 कोटीच्या पुढे गेली आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार एकूण 19,01,413 सत्रांद्वारे 13,01,19,310 लसीच्या मात्रा देण्यात आल्या  आहेत.

HCWs FLWs Age Group 45 to 60 years Over 60 years  

Total

1st Dose 2nd Dose 1st Dose 2nd Dose 1st Dose 2nd Dose 1st Dose 2nd Dose
92,01,728 58,17,262 1,15,62,535 58,55,821 4,35,25,687 14,95,656 4,73,55,942 53,04,679 13,01,19,310

यामध्ये 92,01,728 आरोग्य कर्मचारी (पहिली मात्रा),58,17,262 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा), 1,15,62,535 आघाडीवरील  कर्मचारी (पहिली मात्रा),  58,55,821 आघाडीवरील  कर्मचारी(दुसरी मात्रा), 60 वर्षावरील 4,73,55,942 लाभार्थी (पहिली मात्रा), 53,04,679 (दुसरी मात्रा),45 ते 60 वयोगटातल्या 4,35,25,687 (पहिली मात्रा), आणि 14,95,656 लाभार्थी (दुसरी मात्रा) यांचा समावेश आहे.

देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 59.25% मात्रा आठ राज्यात देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात 29 लाखापेक्षा जास्त लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

Date: 20th April,2021 (Day-95)
HCWs FLWs 45 to 60 years Over 60 years Total Achievement
1stDose 2ndDose 1stDose 2nd Dose 1stDose 2nd Dose 1stDose 2nd Dose 1stDose 2ndDose
31,011 49,605 1,29,803 1,69,213 11,52,918 1,84,590 6,72,979 6,00,078 19,86,711 10,03,486

लसीकरण अभियानाच्या 95 व्या दिवशी (20 एप्रिल 2021) 29,90,197 लसीकरण मात्रा देण्यात आल्या. यामध्ये 19,86,711 लाभार्थींना 42,384 सत्रात पहिली मात्रा आणि 10,03,486 लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.

गेल्या 24 तासात 2,95,041 नव्या रुग्णांची नोंद झाली.

नव्या रुग्णांपैकी 76.32 % रुग्ण, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान या दहा राज्यांमध्ये आहेत.

महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 62,097 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.त्यानंतर उत्तर प्रदेश 29,574 आणि दिल्लीत 28,395 नव्या रुग्णांची नोंद आली.

आलेखात दर्शवल्याप्रमाणे बारा  राज्यात  दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ दिसून येत आहे.

भारतात आज उपचाराधीन  रुग्णांची एकूण संख्या 21,57,538 आहे. ही देशातल्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 13.82 % आहे.

देशातल्या एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी 60.86%  रुग्ण महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या पाच राज्यांमध्ये आहेत.

भारतात एकूण 1,32,76,039 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 85.01 टक्के आहे.

गेल्या 24 तासात 1,67,457 रुग्ण कोरोनातून बरे झाले.

राष्ट्रीय मृत्यू दरात घट होत असून हा दर सध्या 1.17 टक्के आहे.

गेल्या 24 तासात 2,023 रुग्णांचा मृत्यू झाला

यापैकी 82.6% मृत्यू दहा राज्यात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 519 जणांचा मृत्यू झाला, दिल्लीमध्ये 277  जणांचा मृत्यू झाला.

नऊ राज्ये / केंद्र शासित प्रदेशात गेल्या 24 तासात कोविड -19 मुळे एकही मृत्यू झालेला नाही. यामध्ये लडाख ( केंद्रशासित प्रदेश), दमण आणि दीव आणि दादरा नगर हवेली, त्रिपुरा, सिक्कीम, मिझोरम, लक्षदीप, नागालँड, अंदमान आणि निकोबार आणि अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे.

Exit mobile version