महाराष्ट्र राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ कायम

आज सकाळी 7 वाजेपर्यंत 1.94 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण

महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांत दैनंदिन कोविड-19 रुग्णांच्या संख्येत वाढ  नोंदविली जात आहे. गेल्या 24 तासांतील  नव्या  रुग्णसंख्येतील एकूण वाढ 82% इतकी नोंदविली गेली आहे.

गेल्या 24 तासांत 18,327 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक 10,216 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल केरळमध्ये 2,776 तर पंजाबमध्ये 808 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.

आठ राज्यांत रुग्णसंख्येत सतत वाढ होत असलेली दिसून येत आहे.

भारतातील सक्रीय रुग्णांची संख्या आज 1,80,304 वर पोचली आहे. भारतातील सक्रीय रूग्णसंख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1.61%इतकी आहे.

दुसरीकडे 21 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात 1,000 पेक्षा कमी सक्रिय रूग्ण आहेत. अरुणाचल प्रदेश येथे केवळ 3 सक्रीय रुग्णांची नोंद झाली.

केरळ,छत्तीसगड आणि तामिळनाडू येथे गेल्या 24 तासांत सक्रीय रुग्णांची संख्या कमी झालेली दिसून येत आहे. तर त्याच कालावधीत महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात आणि हरीयाना येथे सक्रीय रूग्णसंख्येत वाढ झालेली दिसून येत आहे.

ज्यांना पहिली मात्रा घेऊन 28 दिवस पूर्ण केले आहेत,  अशा लोकांना कोविड-19 ची लसीकरणाची दुसरी मात्रा दिनांक 13 फेब्रुवारी 2021 पासून देण्यास आरंभ झाला. एफएलडब्ल्यूंच्या लसीकरणाला दिनांक 2 फेब्रुवारी 2021पासून आरंभ झाला.

60 वर्षांपेक्षा अधिक आणि सहव्याधी असलेल्या 45 वर्षांहून अधिक वयोगटातील लोकांना कोविड लसीकरण करण्याच्या दुसऱ्या टप्प्याला दिनांक 1 मार्च 2021 पासून आरंभ झाला.

HCWs FLWs 45 to <60 years with Co-morbidities Over 60 years  

Total

1st Dose 2nd Dose 1st Dose 2nd Dose 1st Dose 1st Dose
69,15,661 33,56,830 63,55,989 1,44,191 3,46,758 23,78,275 1,94,97,704

आतापर्यंत प्राप्त अहवालानुसार आज सकाळी 7 वाजेपर्यंत 1.94 कोटीपेक्षा अधिक (1,94,97,704) लोकांना 3,57,478 सत्रांद्वारे लसीची मात्रा देण्यात आली. यात 69,15,661 एचसीडब्ल्यूज (पहिली मात्रा), 33,56,830 एचसीडब्ल्यूज (दुसरी मात्रा) आणि 1,44,191 एफएलडब्ल्यूजना (दुसरी मात्रा) विविध रोग असलेल्या 45 वर्षांहून अधिक वयोगटातील 3,46,758 लोकांना (पहिली मात्रा) तर 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील 23,78,275 (पहिली मात्रा) लोकांना कोविड लसीची मात्रा देण्यात आली.

आज लसीकरण मोहिमेच्या 49 व्या दिवशी (दिनांक 5 मार्च 2021) एकूण 14,92,201लसी देण्यात आल्या. यापैकी 11,99,848 लाभार्थ्यांना एकूण 18,333 सत्रांद्वारे लसीची पहिली मात्रा (एचसीडब्ल्यूज आणि एफएलडब्ल्यूज) देण्यात आली तर आरोग्य कर्मचारी आजी आघाडीवर काम करणाऱ्या 2,92,353 जणांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली .

Date: 5th March,2021
HCWs FLWs 45 to < 60 years with Co-morbidities Over 60 years Total Achievement
1stDose 2ndDose 1stDose 2nd Dose 1stDose 1stDose 1stDose 2ndDose
62,578 2,15,459 2,65,058 76,894 1,10,857 7,61,355 11,99,848 2,92,353

गेल्या 24 तासांत 103 मृत्यूंची नोंद झाली.

मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी 85%.मृत्यु सहा राज्यांत झाले आहेत. महाराष्ट्रात (53) त्याखालोखाल केरळमध्ये 16 तर पंजाबमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

अठरा राज्ये/केंद्रशासित प्रदेशात  गेल्या 24 तासांत कोविड-19 मुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. गुजरात, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, लक्षद्वीप, पुडुचेरी,आसाम, सिक्कीम, मणिपूर, लडाख (कें.प्र.) मेघालय,अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मिझोराम, अंदमान आणि निकोबार द्वीपकल्प, दिव आणि दमण आणि दादरा- नगरहवेली ही ती राज्ये आहेत.