Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

विदर्भातील पहिल्या अ‍ॅग्रीकल्चर मॉलला शुभारंभ

कृषी केंद्र डॉट कॉमची फ्रॅँचायझी आता अमरावतीत

विदर्भातील पहिल्या अ‍ॅग्रीकल्चर मॉलचे उदघाटन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. स्थानिक जाफरजीन प्लॉट स्थित अद्ययावत अशा कृषी मॉल मध्ये शेती विषयक सर्वच वस्तू एकाच छताखाली उपलब्ध आहेत. विनुष्का सोल्यूशन्स प्रा. लि. या विदर्भातील पहिल्या अत्याधुनिक कृषी मॉलमुळे शेतकºयांना शेती उत्पादने खरेदी करणे अगदी सोपे झाले आहे.

याप्रसंगी अमरावतीचे महापौर चेतन गावंडे, बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवि राणा, अमरावती भाजपा शहराध्यक्ष किरण पातूरकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी कृषी केंद्र डॉट कॉमच्या कृषी मॉलला भेटी देऊन शेतकºयांसाठी सुरू करण्यात आलेल्या मॉलला शुभेच्छा दिल्यात.

याआधी कंपनीतर्फे देशातील पहिले कृषी आॅनलाईन स्टोअर krushikendra.com सुरू झाले असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या मेगा स्टोअरमध्ये बियाणे, किटकनाशके, खते, मायक्रोन्यूट्रियन्टस्, सरफेक्टंटस्, कृषी अवजारे, कृषी पंप अशा अनेक गोष्टी या स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत. आॅनलाईन विक्रीच्या सुविधेमुळे शेतीउपयोगी वस्तू शेतकºयांना घरपोच मिळतात. अशा दोन हजाराहून जास्त वस्तू प्रत्यक्ष मॉलमध्ये, तसेच आॅनलाईन विक्रीसाठी उपलब्ध असून शेतकरी बांधव त्याचा लाभ घेऊ शकतात.

कृषीकेंद्र डॉट कॉम ही शेतकºयांना घरपोच वस्तू सेवा देणारी पहिलीच मेगा आॅनलाईन कृषी स्टोअर आहे. याशिवाय शेतकरी मार्गदर्शन आणि त्यांच्या शंकांच्या निरसनासाठी याठिकाणी स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्यात आलेली असून आजतागायत हजारो शेतकºयांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. लवकरच शेतकºयांच्या सोयीसाठी टोलफ्री नंबर, चॅट कॉलरची सुविधा कंपनीकडून देण्यात येणार आहे. याशिवाय बाजारभावाची ताजी माहिती कळावी यासाठी अ‍ॅपही उपलब्ध करून दिले जाणार आहे.

विनुष्का सोल्यूशन्स प्रा. लिमिटेडच्या नाविण्यपूर्ण संकल्पनेमुळे शेतकºयांना आता सुलभतेने शेती उत्पादनांची खरेदी करता येणार असून त्यांचा वेळ वाचणार आहे. लवकरच संपूर्ण महाराष्टÑात असे फ्रेंचाईझी स्टोअर्स सुरू करण्याचा मानस असल्याची माहिती विनुष्का सोल्यूशन्सच्या संचालकांनी दिली.

कृषी मॉलच्या उदघाटनप्रसंगी सर्वश्री मदन महाराज, अ‍ॅड. ब्रिजेश तिवारी, विनुष्का सोल्युशन प्रा. लि. चे विनीत श्रीराव, सौ . सुचिता श्रीराव, सौ. सुनंदा श्रीराव, तसेच युवा नेते अनिकेत देशमुखसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version