गेल्या 24 तासांत देशात 67,084 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 96.95%

गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 46 लाख 44 हजारांहून अधिक  (46,44,382) मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 171 कोटी 28 लाखांचा (1,71,28,19,947)   टप्पा ओलांडला आहे.
देशभरात 1,91,17,879 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.
आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,03,98,679
2nd Dose 99,16,566
Precaution Dose 37,74,605
FLWs 1st Dose 1,84,03,692
2nd Dose 1,73,47,897
Precaution Dose 50,68,860
Age Group 15-18 years 1st Dose 5,08,96,400
2nd Dose 1,05,23,483
Age Group 18-44 years 1st Dose 54,65,63,415
2nd Dose 42,13,47,177
Age Group 45-59 years 1st Dose 20,13,26,926
2nd Dose 17,51,89,201
Over 60 years 1st Dose 12,56,52,278
2nd Dose 10,91,38,465
Precaution Dose 72,72,303
Precaution Dose 1,61,15,768
Total 1,71,28,19,947

 

गेल्या 24 तासांत 1,67,882  रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची  सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,11,80,751 झाली आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 96.95% झाला आहे.

गेल्या 24 तासांत, देशात 67,084 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 7,90,789 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 1.86% आहे.

कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेच्या विस्ताराचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 15,11,321 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 74 कोटी 61 लाखांहून अधिक (74,61,96,071) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 6.58% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 4.44%.इतका आहे.