देशात गेल्या 24 तासात 6,317 नव्या रुग्णांची नोंद

देशातली उपचाराधीन रुग्णसंख्या (78,190) असून 575 दिवसातली सर्वात कमी संख्या

भारताने गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या  57,05,039 मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण   138.96 कोटीपेक्षा जास्त  (1,38,95,90,670) मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,47,11,227 सत्रांद्वारे  मात्रा देण्यात आल्या  आहेत.

आज  सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार दिलेल्या एकूण मात्रांचा  समावेश पुढील सारणीत  आहे-

 

 

HCWs

1st Dose 1,03,86,502
2nd Dose 96,57,186
 

FLWs

1st Dose 1,83,84,345
2nd Dose 1,67,91,268
 

Age Group 18-44 years

1st Dose 48,90,85,845
2nd Dose 30,06,95,171
 

Age Group 45-59 years

1st Dose 19,21,00,064
2nd Dose 14,19,68,808
 

Over 60 years

1st Dose 12,00,06,899
2nd Dose 9,05,14,582
Total 1,38,95,90,670

 

गेल्या 24 तासात 6,906 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून (महामारीच्या सुरवातीपासून) कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण  3,42,01,966 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर  98.40% झाला आहे.

सलग  55 दिवसांपासून  15,000  पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

गेल्या 24 तासात देशात  6,317 नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या  78,190  असून  575  दिवसातली ही सर्वात कमी संख्या आहे. उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या  0.22% असून  मार्च 2020 पासून सर्वात  कमी आहे.

देशभरात चाचण्या क्षमता  व्यापक करण्यात येत असून देशात गेल्या 24 तासात 12,29,512  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 66.73  कोटीहून अधिक  (66,73,56,171)  चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 0.58 %  असून गेले   38 दिवस  1% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 0.51%.  असून गेले 78  दिवस 2% पेक्षा कमी आणि  114  दिवस  3% पेक्षा कमी आहे.