Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

गेल्या 24 तासात देशात 44,877 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 97.55%

गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 49 लाख 16 हजारांहून अधिक (49,16,801) मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 172 कोटी 81 लाखांचा (1,72,81,49,447) टप्पा ओलांडला आहे.

देशभरात 1,93,53,556 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,03,99,410
2nd Dose 99,30,634
Precaution Dose 38,78,308
FLWs 1st Dose 1,84,05,152
2nd Dose 1,73,74,818
Precaution Dose 53,58,037
Age Group 15-18 years 1st Dose 5,20,32,858
2nd Dose 1,47,92,245
Age Group 18-44 years 1st Dose 54,80,44,294
2nd Dose 42,63,39,386
Age Group 45-59 years 1st Dose 20,16,19,377
2nd Dose 17,62,74,802
Over 60 years 1st Dose 12,58,81,409
2nd Dose 10,98,24,107
Precaution Dose 79,94,610
Precaution Dose 1,72,30,955
Total 1,72,81,49,447

 

गेल्या 24 तासांत 1,17,591 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात (महामारीच्या सुरवातीपासून)  सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,15,85,711 झाली आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 97.55% झाला आहे.

गेल्या 24 तासांत, देशात 44,877 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 5,37,045 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 1.26% आहे.

कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेच्या विस्ताराचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 14,15,279 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 75 कोटी 7 लाखांहून अधिक (75,07,35,858) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 4.46% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 3.17%.इतका आहे.

Exit mobile version