Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

गेल्या 24 तासात देशात 3,06,064 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 93 .07 टक्के

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 162.62 कोटींपेक्षा अधिक मात्रा देण्याचे काम पूर्ण

गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या जवळपास 27 लाख (27,56,364) मात्रा देण्यात आल्या. त्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 162 कोटी 26 लाखांचा (1,62,26,07,516) टप्पा ओलांडला आहे.

देशभरात 1,75,24,670 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,03,92,126
2nd Dose 98,21,360
Precaution Dose 27,40,418
FLWs 1st Dose 1,83,91,199
2nd Dose 1,71,41,611
Precaution Dose 26,87,668
Age Group 15-18 years 1st Dose 4,19,32,411
Age Group 18-44 years 1st Dose 53,45,36,314
2nd Dose 38,84,23,497
Age Group 45-59 years 1st Dose 19,91,58,553
2nd Dose 16,65,46,977
Over 60 years 1st Dose 12,41,24,617
2nd Dose 10,39,58,686
Precaution Dose 27,52,079
Precaution Dose 81,80,165
Total 1,62,26,07,516

 

 

गेल्या 24 तासात 2,43,495 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात (महामारीची  सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 3,68,04,145 झाली आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता  93.07 टक्के  इतका झाला आहे.

गेल्या 24 तासांत, देशात 3,06,064 नव्या कोविड बाधितांची  नोंद झाली.

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 22,49, 335  इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 5.69 टक्के  इतके आहे.

कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेचा विस्तार करण्याचे काम देशभरात सुरू आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 14,74,753 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 71 कोटी 69 लाखांहून अधिक (71,69,95,333) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 17.03 टक्के आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 20.75 टक्के इतका आहे.

Exit mobile version