Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

गेल्या 24 तासात देशात 2,82,970 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 18,31,000

गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 76 लाखांहून अधिक (76,35,229) मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 158 कोटी 88 लाखांचा (1,58,88,47,554) टप्पा ओलांडला आहे.

देशभरात 1,70,80,295 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे.

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,03,90,731
2nd Dose 97,91,120
Precaution Dose 21,52,696
FLWs 1st Dose 1,83,89,470
2nd Dose 1,70,79,980
Precaution Dose 18,65,300
Age Group 15-18 years 1st Dose 3,73,04,693
Age Group 18-44 years 1st Dose 52,85,80,975
2nd Dose 37,54,53,651
Age Group 45-59 years 1st Dose 19,81,36,987
2nd Dose 16,28,20,687
Over 60 years 1st Dose 12,34,42,617
2nd Dose 10,17,90,380
Precaution Dose 16,48,267
Precaution Dose 56,66,263
Total 1,58,88,47,554

गेल्या 24 तासात 1,88,157 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 3,55,83,039 झाली आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 93.88% झाला आहे.

 

गेल्या 24 तासात, देशात 2,82,970 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

 

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 18,31,000 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 4.83% आहे.

कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेचा विस्तार करण्याचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 18,69,642 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 70 कोटी 74 लाखांहून अधिक (70,74,21,650) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 15.53% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 15.13%.इतका आहे.

Exit mobile version