गेल्या 24 तासांत देशात 26,041 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या (2,99,620) एकूण बाधितांच्या संख्येच्या 0.89%

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 38,18,362 मात्रा देण्यात आल्यामुळे, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांच्या संख्येने 86 कोटींचा (86,01,59,011) महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. देशभरात 84,07,679 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे :

 

HCWs

1st Dose 1,03,71,418
2nd Dose 88,35,377
 

FLWs

1st Dose 1,83,49,453
2nd Dose 1,48,33,709
 

Age Group 18-44 years

1st Dose 34,82,66,215
2nd Dose 7,45,08,007
 

Age Group 45-59 years

1st Dose 15,64,81,731
2nd Dose 7,39,69,804
 

Over 60 years

1st Dose 9,97,47,469
2nd Dose 5,47,95,828
Total 86,01,59,011

 

 

गेल्या 24 तासात 29,621 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 3,29,31,972 झाली आहे.

परिणामी, सध्या, भारतातील रोगमुक्ती दर 97.78% आहे. मार्च 2020 पासून आतापर्यंतच्या कालावधीतील हा सर्वोच्च रोगमुक्ती दर आहे.

 

केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांमुळे, गेले सलग ब्याण्णव दिवस, रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 हून कमी राखण्यात यश आले आहे.

गेल्या 24 तासांत, 26,041 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

 

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आज 2,99,620 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.89% आहे.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमता विस्ताराचे काम जारी असून गेल्या 24 तासात देशात एकूण 11,65,006 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 56 कोटी 44 लाखांहून अधिक (56,44,08,251) चाचण्या करण्यात आल्या.

देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.94% असून गेले 94 दिवस हा दर 3% हून कमी राहिला आहे तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 2.24% इतका आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर गेले सलग 28 दिवस 3% हून कमी आहे आणि गेले सलग 111 दिवस हा दर 5% हून कमी राहिला आहे.