गेल्या 24 तासात 25,920 नवीन रुग्णसंख्या

देशात कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याने गेल्या सहा दिवसांपासून नव्या रुग्णांची संख्या ३० हजारांहून कमी नोंदवली जात आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे २५ हजार ९२० नवे रुग्ण आढळून आले. तर ४९२ जणांचा मृत्यू झाला आहे. ही रुग्णसंख्या कालच्या दिवशीच्या तुलनेत १३ टक्क्यांनी कमी आहे.

गेल्या दिवसभरात ६६ हजार २५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सध्या २ लाख ९२ हजार ९२ सक्रिय रुग्ण आहेत. दर दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट २ टक्क्यांवर आला आहे. आतापर्यंत देशातील एकूण ४ कोटी १९ लाख ७७ हजार २३८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गुरूवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.०३ टक्के नोंदवण्यात आला होता. तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर २.६१ टक्के होता. सलग सहाव्या दिवशी देशात कोरोनाबाधितांची संख्या ३० हजारांच्या खाली आली.

कोविड -19 विषयक अद्ययावत माहिती

  • लसीकरण मोहिमेत आत्तापर्यंत 174.64 कोटी लसींच्या मात्रा दिल्या गेल्या
  • भारतात सध्या उपचाराधीन रुग्णसंख्या 2,92,092 इतकी  आहे
  • भारतात सध्या उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.68% आहे
  • रुग्ण बरे होण्याचा दर 98.12%
  • गेल्या 24 तासात 66,254 जण कोविडमधून बरे झाले, कोविडमुक्त झालेल्यांची एकूण संख्या 4,19,77,238 वर पोहचली आहे
  • गेल्या 24 तासात 25,920 नवीन रुग्णसंख्या नोंदवली गेली
  • दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (2.07%)
  • साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (2.76%)
  • देशभरात आत्तापर्यंत 75.68 कोटी निदान चाचण्या केल्या गेल्या. गेल्या चोवीस तासात 12,54,893 निदान चाचण्या केल्या गेल्या.