साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 17.17 टक्के
गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या जवळपास 62 लाख (62,29,956) मात्रा देण्यात आल्या. त्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 162 कोटी 92 लाखांचा (1,62,92,09,308) टप्पा ओलांडला आहे.
देशभरात 1,77,12,517 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे
Cumulative Vaccine Dose Coverage | ||
HCWs | 1st Dose | 1,03,92,701 |
2nd Dose | 98,26,681 | |
Precaution Dose | 28,42,155 | |
FLWs | 1st Dose | 1,83,91,675 |
2nd Dose | 1,71,52,993 | |
Precaution Dose | 28,26,940 | |
Age Group 15-18 years | 1st Dose | 4,27,23,464 |
Age Group 18-44 years | 1st Dose | 53,55,80,374 |
2nd Dose | 39,10,87,802 | |
Age Group 45-59 years | 1st Dose | 19,93,26,389 |
2nd Dose | 16,73,04,587 | |
Over 60 years | 1st Dose | 12,42,30,375 |
2nd Dose | 10,43,90,089 | |
Precaution Dose | 31,33,083 | |
Precaution Dose | 88,02,178 | |
Total | 1,62,92,09,308 |
गेल्या 24 तासात 2,67,753 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात (महामारीची सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 3,70,71,898 झाली आहे.
परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 93.15 टक्के इतका झाला आहे.
गेल्या 24 तासांत, देशात 2,55,874 नव्या कोविड बाधितांची नोंद झाली.
भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 22,36,842 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 5.62 टक्के इतके आहे.
कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेचा विस्तार करण्याचे काम देशभरात सुरू आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 16,49,108 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 71 कोटी 88 लाखांहून अधिक (71,88,02,433) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 17.17 टक्के आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 15.52 टक्के इतका आहे.