गेल्या 24 तासांत देशात 16,051 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

भारतातील सध्याची कोविड सक्रिय रुग्णसंख्या 2,02,131

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.33%

गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 7 लाखांहून अधिक (7,00,706) मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 175 कोटी 46 लाखांचा (1,75,46,25,710) टप्पा ओलांडला आहे.

देशभरात 1,98,99,635 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, नागरिकांना आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे-:

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,04,00,693
2nd Dose 99,52,973
Precaution Dose 40,49,502
FLWs 1st Dose 1,84,07,927
2nd Dose 1,74,18,259
Precaution Dose 59,11,252
Age Group 15-18 years 1st Dose 5,36,77,342
2nd Dose 2,17,30,069
Age Group 18-44 years 1st Dose 55,03,74,397
2nd Dose 43,59,27,908
Age Group 45-59 years 1st Dose 20,20,44,355
2nd Dose 17,83,73,700
Over 60 years 1st Dose 12,62,13,826
2nd Dose 11,11,19,012
Precaution Dose 90,24,495
Precaution Dose 1,89,85,249
Total 1,75,46,25,710

 

गेल्या 24 तासात 37,901 रुग्ण कोविड आजारातून बरे झाले. त्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,21,24,284 झाली आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर 98.33% झाला आहे.

गेल्या 24 तासांत, 16,051 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

भारतातील कोविड सक्रिय (उपचाराधीन) रुग्णसंख्या सध्या 2,02,131 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रिय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.47% आहे.

कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेचा विस्तार करण्याचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 8,31,087 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 76 कोटी 1 लाखांहून अधिक (76,01,46,333) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.12% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 1.93% इतका आहे.