Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

गेल्या 24 तासांत देशात 13,596 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत लसीच्या एकूण 97.79 कोटी मात्रा देण्यात आल्या

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत, लसींच्या 12,05,162 मात्रा देण्यात आल्यामुळे, भारताच्या कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांच्या एकूण संख्येने 97.79 कोटी मात्रांचा  (97,79,47,783) टप्पा  पार केला आहे. देशभरात 96,88,300 सत्रांच्या आयोजनातून हे लसीकरण साध्य करण्यात आले आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे:

HCWs 1st Dose 1,03,75,864
2nd Dose 90,77,901
 

FLWs

1st Dose 1,83,61,949
2nd Dose 1,55,20,467
 

Age Group 18-44 years

1st Dose 39,31,57,500
2nd Dose 11,07,36,109
 

Age Group 45-59 years

1st Dose 16,77,59,306
2nd Dose 8,60,28,053
 

Over 60 years

1st Dose 10,57,36,587
2nd Dose 6,11,94,047
Total 97,79,47,783

गेल्या 24 तासांत 19,582 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे देशात (महामारीची  सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 3,34,39,331 झाली आहे.

परिणामी, सध्या देशातील रोगमुक्ती दर 98.12% आहे. मार्च 2020 पासून आतापर्यंतच्या कालावधीतील हा उच्चांकी रोगमुक्ती दर आहे.

केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सहयोगात्मक प्रयत्नांमुळे, गेले सलग 113 दिवस नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 हून कमी असण्याचा कल कायम आहे.

गेल्या 24 तासांत,13,596 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली. गेल्या 230 दिवसांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे

देशातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या 2 लाखांहून कमी असून सध्या 1,89,694 इतकी असून ही गेल्या 221 दिवसांतील सर्वात कमी आहे.

देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.56% आहे.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमता विस्ताराचे काम जारी आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 9,89,493 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 59 कोटी 19 लाखांहून अधिक (59,19,24,874) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.37 % असून गेले 115 दिवस हा दर 3% हून कमी राहिला आहे. तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 1.37% आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर गेले सलग 49 दिवस 3% हून कमी आहे आणि आता गेले सलग 132  दिवस हा दर 5% हून कमी राहिला आहे.

Exit mobile version