देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 25,404 नवे दैनंदिन रुग्ण
भारताने गेल्या 24 तासात 78,66,950 मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण 75.22 कोटीपेक्षा जास्त मात्रा (75,22,38,324) दिल्या आहेत. एकूण 76,12,687 सत्रांद्वारे मात्रा देण्यात आल्या आहेत.
यामध्ये यांचा समावेश आहे-
HCWs | 1st Dose | 1,03,64,718 |
2nd Dose | 86,13,207 | |
FLWs |
1st Dose | 1,83,38,867 |
2nd Dose | 1,41,07,030 | |
Age Group 18-44 years |
1st Dose | 30,32,52,342 |
2nd Dose | 4,54,19,375 | |
Age Group 45-59 years |
1st Dose | 14,47,82,266 |
2nd Dose | 6,38,06,413 | |
Over 60 years |
1st Dose | 9,37,73,048 |
2nd Dose | 4,97,81,058 | |
Total | 75,22,38,3 |
देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.
गेल्या 24 तासात 37,127 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,24,84,159 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
कोरोनातून बरे होण्याचा दर 97.58% झाला आहे.
सलग 79 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.
गेल्या 24 तासात 25,404 नव्या रुग्णांची नोंद झाली.
देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,62,207 आहे. उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्णांच्या 1.09% आहेत.
चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून देशात गेल्या 24 तासात 14,30,891 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 54.44 कोटीहून अधिक (54,44,44,967) चाचण्या केल्या आहेत.
देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.07% असून गेले 81 दिवस 3% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.78%. असून गेले 15 दिवस 3% पेक्षा कमी असून मागील 98 दिवस 5% पेक्षा कमी आहे.