चीनकडून होणाऱ्या आयातीत होतेय घट

कोविड-19 महामारीमुळे  जागतिक आणि  देशांतर्गत पुरवठ्यात  अनेक मर्यादा आल्या आणि जागतिक मागणीतही घसरण झाली. एप्रिल- जुलै  2020 या काळात भारताची चीनमधून आयात घसरून  16.60 अब्ज अमेरिकी डॉलर्स झाली. गेल्या वर्षी याच काळात ही आयात 23.45 अब्ज अमेरिकी डॉलर्स होती. चीनमधून आयात होणाऱ्या  सर्वोच्च 50 वस्तूंच्या एप्रिल- जुलै  2020 या काळातल्या आयातीची   एप्रिल- जुलै  2019 शी तुलना परिशिष्टात देण्यात आली आहे. इलेक्ट्रोनिक्स भाग,  टेलीकॉम उपकरणे,संगणक हार्ड वेअर, दुग्ध व्यवसायासाठीची औद्योगिक यंत्रसामग्री, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रोनिक्स, इलेक्ट्रिक यंत्रसामग्री, खते, लोखंडी आणि स्टील उत्पादने इत्यादीच्या आयातीत घट दिसून आली.

याचा परिणाम कमी करण्यासाठी केंद्र सरकारने,देशांतर्गत क्षमता विस्तारण्यासाठी पावले उचलत, मोबाईल फोन, इलेक्ट्रोनिक घटक, वैद्यकीय उपकरणे,यासारख्या निवडक क्षेत्रात उत्पादन संलग्न प्रोत्साहन तसेच व्यवसाय सुलभता  याद्वारे देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणांची अंमलबजावणी केली.

सुरक्षिततेच्या कारणास्तव आणि भारतीय सायबर सुरक्षा आणि सार्वभौमत्व अखंडित राखण्यासाठी केंद्र सरकारने जून 2020 आणि सप्टेंबर 2020 मध्ये विशिष्ट ऐप वर बंदी घातली.  या ऐपना पर्यायी ऐप, गुगल प्ले स्टोअर, अॅपल स्टोअरवर उपलब्ध आहेत. भारतीय ऐपसाठी पोषक वातावरण निर्मितीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने डिजिटल इंडियाआत्मनिर्भर भारत नवोन्मेश आव्हान सुरु केले आहे.यासाठी  त्या-त्या श्रेणीत जागतिक स्पर्धा करण्याची संभाव्य क्षमता बाळगणाऱ्या सर्वोच्च भारतीय ऐपची छोटी सूची करण्यात आली आहे.

कोविड महामारीमुळे आलेल्या मंदीच्या प्रभावातून जागतिक अर्थव्यवस्था सावरल्यानंतरच या उपायांचा उद्योग क्षेत्रावरचा संपूर्ण परिणाम दिसून येईल. अशी माहिती  केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज राज्य सभेत एका लेखी उत्तरात  दिली.