Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

मुसळधार पाऊस, चक्रीवादळाची शेतकऱ्यांना मिळणार तत्काळ सूचना

वादळ धडकणे, तीव्रता आणि खराब हवामान, जसे मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि वादळ यांचा मागोवा घेणे आणि अंदाज व्यक्त करण्याच्या हवामान शास्त्र विभागाच्या कामात लक्षणीय सुधारणा- डॉ मृत्युंजय मोहपात्रा, महासंचालक, आयएमडी

भारतीय हवामान विभाग लवकरच वेगवान, प्रभावी चक्रीवादळ इशारा प्रणाली सुरु करणार असल्याची माहिती महासंचालक डॉ. मृत्यूंजय मोहपात्रा यांनी दिली. भारतीय किनारपट्ट्यांवर दरवर्षी येणाऱ्या चक्रीवादळांमुळे होणारे आर्थिक नुकसान आणि मालमत्तेचे नुकसान कमी करणे हा यामागचा उद्देश आहे. शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे.

डॉ मोहपात्रा म्हणाले, जगभरात चक्रीवादळाने होणारे नुकसान वाढत आहे. भारताची विस्तारणारी अर्थव्यवस्था पाहता, मालमत्तेचे आणि पायाभूत सुविधांचे कमीत कमी नुकसान होईल यासाठी वेगवान, प्रभाव-आधारीत चक्रीवादळ इशारा प्रणाली या हंगामापासून सुरु करण्यात येईल.

नवीन प्रणालीचा एक भाग म्हणून जिल्हा किंवा विशिष्ट निर्देशांचे इशारे तयार आणि प्रसारित केले जातील ज्यात स्थानिक लोकसंख्या, पायाभूत सुविधा, वसाहती, जमीनीचा वापर आणि इतर घटक लक्षात घेऊन माहिती प्रसारीत केली जाईल. सर्व आपत्ती निवारण संस्था संबंधित जिल्ह्यांसाठी कार्टोग्राफिक, भूशास्त्रीय आणि जलविज्ञानविषयक माहितीचा व्यापक वापर करतील.

राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधीकरणाने (NDMA), राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम शमन प्रकल्प (NCRMP) हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत एनडीएमए हवामानखात्याच्या आणि किनारी राज्यांच्या सहकार्याने वेब-आधारीत वेगवान कंपोझिट रिस्क अॅटलस तयार करत आहे.

तत्पूर्वी आज सकाळी भारतीय हवामानखात्याने डॉ मृत्यूंजय मोहपात्रा यांच्या अध्यक्षतेखाली ऑक्टोबर-डिसेंबर 2020 या चक्रीवादळ हंगामा संदर्भात तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला नॅशनल सेंटर फॉर मेडियम रेंज वेदर फोरकास्टींग, भारतीय हवाई दल, भारतीय नौदल, केंद्रीय जल आयोग, आयआयटी दिल्ली, इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फर्मेशन सर्विसेस, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण, एनडीआरएफ, मत्स्य विभाग, पंक्च्युअलिटी सेल, भारतीय रेल्वे यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हवामान शास्त्र विभागाच्या नव्या उपक्रमांची हितसंबंधीयांना माहिती

भारतीय हवामानशास्त्र विभागाने, हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक, डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांच्या अध्यक्षतेखाली  आज वादळपूर्व ऑनलाईन बैठक आयोजित केली होती. ऑक्टोबर- डिसेंबर 2020 या वादळ काळातील तयारी, गरजांचा आढावा घेणे आणि त्याची योजना बनवणे तसेच आयएमडी च्या विविध उपक्रमांची माहिती, हितसंबंधी व्यक्ती आणि संस्थांना देणे हा या बैठकीचा उद्देश होता.

आयएमडी चे महासंचालक डॉ. मोहपात्रा यांनी यावेळी बैठकीची सुरुवात करतांना हवामानाशी संबंधित विविध मुद्दे आणि शेवटच्या टोकापर्यंत संपर्क यंत्रणा पोहोचवण्यासारख्या अनेक मुद्दयांना स्पर्श केला तसेच, ज्या ज्या क्षेत्रात सुधारणा आवश्यक आहेत अशा क्षेत्रांवरही चर्चा केली. हवामानाचा माग घेणे, वादळ धडकण्याची वेळ, त्याची तीव्रता आणि खराब हवामान, जसे की मुसळधार पाउस, जोरदार वारे आणि वादळ अशा सर्वांचा अंदाज बांधण्याच्या भारतीय हवामान विभागाच्या क्षमतेत लक्षणीय सुधारणा  झाली आहे, असे त्यांनी सांगितले. वादळाच्या काळापूर्वी आयएमडी संवादात्मक दर्शनी व्यवस्था लावेल, ज्यावर हवामानाच्या स्थितीचे आणि अंदाजाचे निरीक्षण करता येईल तसेच वादळाची दिशा आणि तीव्रता पण जीआयएस प्लॅटफॉर्मवर बघता येईल, असे त्यांनी सांगितले.

आयएमडीने हवामानासंदर्भात अनेक मोबाईल अॅप्स विकसित केले आहेत. ज्यात विजेची सूचना देण्यासाठी ‘दामिनी’, हवामानाची सूचना देण्यासाठी ‘मौसम’ आणि ‘उमंग’-यात वादळाचीही पूर्वसूचना दिली जाईल. तसेच ‘मेघदूत’ अॅप कृषीहवामानविषयक सल्ले देण्यासाठी विकसित करण्यात आले आहे.

प्रदेशिक हवामान विशेष केंद्र (RSMC) येथे मोफत नोंदणी सुविधा उपलब्ध असून www.rsmcnewdelhi.imd.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी केल्यास शेतकऱ्यांना वादळाविषयी अद्ययावत सूचना मिळू शकतील, असेही त्यांनी सांगितले.

आपल्याला भूतकाळापासून शिकण्याची गरज असून, वारंवार होत असलेल्या चुका टाळायला हव्यात, असेही त्यांनी सांगितले.आपल्याला सर्व हितसंबंधीयांच्या सहकार्याने एक अचूक अंदाज बांधणारी हवामान शास्त्र व्यवस्था विकसित करावी लागेल, ज्यामुळे, भविष्यात आपण जी

Exit mobile version