Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

शेतकरी मित्रांनो, पोस्ट ऑफिस बँक खात्यासाठी एटीएम कार्ड असे काढा…

पैशांची बचत करणे भविष्यासाठी गरजेची असते. आपल्या खर्चातून काही पैसे वाचतात, तेव्हा लोक हे पैसे त्यांच्या बँक खात्यात ठेवतात, जेणेकरून ते आवश्यकतेनुसार वापरता येतील. भारतात अनेक सरकारी आणि निमसरकारी बँका असल्या तरी अनेकांनी बचत बँक खाती पोस्ट ऑफिसमध्येही उघडली आहेत. सहसा लोक थेट पोस्ट ऑफिसमध्ये पैसे काढण्यासाठी जातात. मात्र तसे पोस्टात जाण्याची गरज नाही. कारण पोस्ट ऑफिसमध्येही बँकेप्रमाणे एटीएम कार्ड उपलब्ध असते. पोस्ट ऑफिस बचत बँक खात्यासाठी एटीएम कार्ड हवे असेल तर त्यासाठी अर्ज करण्याचा सोपा मार्ग जाणून घेऊया…

1. तुमच्या पोस्ट ऑफिस बचत बँक खात्यावर एटीएम कार्ड मिळविण्यासाठी तुम्हाला एटीएम फॉर्म भरावा लागेल. एटीएम व्यतिरिक्त, तुम्ही या फॉर्ममध्ये इंटरनेट बँकिंग, एसएमएस आणि मोबाइल बँकिंग सेवेसाठी विनंती करू शकता.

2. हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमचे पासबुकही जोडावे लागेल. त्यानंतर हा फॉर्म GDS द्वारे सत्यापित केला जाईल आणि तुमचे पासबुक सबमिट करण्यासाठी SB-28 पावती दिली जाईल.

3. आता GDS तुमचा फॉर्म BO जर्नल किंवा BO दैनिक खात्यावर पाठवेल. त्यानंतर ते संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये जाईल आणि तेथे पोस्ट मास्टर तुमची सर्व चौकशी करतील. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, तो खातेदाराच्या नावावर एटीएम कार्ड जारी करेल.

4. त्याच वेळी, तपासणीत योग्य आढळल्यास, एसपीएम एसबी एटीएम कार्ड गार्ड फाइलमध्ये ठेवेल. त्यानंतर एटीएम जारी करण्याची तारीख लिहिल्यानंतर, पोस्ट मास्टर रजिस्टरमध्ये सही करेल आणि त्यानंतर तुमचे एटीएम कार्ड जीडीएम बीपीएमला पाठवले जाईल. शेवटी, RICT-CBS शाखेत जिथून तुम्हाला हे ATM कार्ड मिळाले आहे, तिथे तुम्ही ते गोळा करू शकता आणि तुमचे पासबुक सोबत घेऊन जाऊ शकता.

Exit mobile version