Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

रेशनकार्ड मिळवण्यासाठी ही online पद्धत वापरा

आधारकार्डच्या जमान्यातही रेशनकार्डचे महत्त्व टिकून आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात तर सरकारी धान्य योजनेसाठी रेशनकार्डचा फार मोठा फायदा जनतेला झाला. सर्व सरकारी आणि खाजगी कागदपत्रांपैकी रेशनकार्ड हे एक आहे. हे राज्य सरकार त्यांच्या संबंधित राज्यांसाठी जारी करते. मात्र, आता वन नेशन वन कार्डचा वापरही हळूहळू होत आहे. शिधापत्रिका हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. याच्या मदतीने एकीकडे गोरगरिबांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या स्वस्त व मोफत रेशनचा लाभ घेता येत असतानाच दुसरीकडे केवळ शासकीय शिधापत्रिकेद्वारे अनेक शासकीय योजनांचा लाभ घेता येतो.

आपल्या देशात या सुविधेचा लाभ घेणारे गरीब लोक मोठ्या संख्येने आहेत, परंतु अजूनही अनेक गरजू लोक आहेत ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही, किंवा काहींनी काही कारणाने त्या तयार करवून घेतल्या नाहीत. म्हणून रेशन कार्ड मिळवण्याच्या सोप्या प्रक्रियेबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही रेशन कार्ड बनवू शकता.

असा करावा अर्ज

आॅनलाईन पदद्धीचा वापर करून रेशन कार्ड मिळवता येते. त्यासाठी संबंधित राज्याच्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म डाऊनलोड करता येतो. त्यात योग्य ती माहिती भरावी. शिवाय त्याला 2 रुपयांची कोर्ट फी स्टॅप चिकटवावा. रेशनकार्डमध्ये नाव वाढविणे, वगळणे, बदल करणे, दुय्यम प्रत मिळवणे यासाठीही शासनाच्या या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहेत. अर्जासोबत आधारकार्ड किंवा मतदान कार्ड, बॅँक खाते यांची माहिती जोडून एक अर्जदाराचा फोटो जोडणे आवश्यक आहे.

अर्जदार अठरा वर्षांचा पूर्ण असावा, तसेच त्याचे एकापेक्षा जास्त राज्यात रेशन कार्ड नसावे. या प्रमुख अटी लक्षात घेणे गरजेचे आहे. तालुक्यातील पुरवठा विभागाच्या कार्यालयात अर्ज जमा केल्यानंतर तो क्षेत्रीय पडताळणीसाठी पाठविण्यात येतो. त्यातील माहिती योग्य वाटल्यास महिनाभरात अर्जदाराला रेशन कार्ड अदा केले जाते.

महाराष्टÑ शासनाच्या पुढील वेबसाईटवरhttp://mahafood.gov.in/ अर्ज प्रक्रिया आणि अर्ज डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.
याशिवाय वन नेशन वन रेशन संबंधी माहिती आणि तक्रारीसाठी 14445 या हेल्पलाईनवर फोन करता येतो.

Exit mobile version