डीजेच्या मोठ्या आवाजामुळे कोंबड्यांचा मृत्यू

डीजेच्या मोठ्या आवाजामुळे काय होऊ शकते आणि त्यापासून काय नुकसान होते याचा प्रत्यय इथे एकाला आला आहे. ओरिसा राज्यात ही घटना घडली आहे. या संदर्भात पोलिसात तक्रारही नोंदविली आहे. निलागिरी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीत, पोल्ट्री फार्मचे मालक कंडागराडी गावातील रहिवासी, रणजित परीडा, यांनी आरोप केला आहे. त्यांच्या शेजारी रामचंद्र परीडा यांच्या मिरवणुकीत डीजे वाजल्याने त्यांच्या कोंबड्यांचा मृत्यू झाला. मोठ्या आवाजाने कोंबड्यांना हृदयविकाराचा झटका आला. रणजितने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास डीजे बँडसह मिरवणूक त्यांच्या पोल्ट्री समोरून गेली. डीजे जवळ येताच कोंबड्या विचित्र वागू लागल्या. काहींनी उड्या मारायला सुरुवात केली.

शॉक लागल्याने कोंबड्यांचा मृत्यू होतो
रणजीत डीजेला वारंवार आवाज कमी करण्यास सांगत होता. पण शेजाऱ्यांनी ते ऐकले नाही. त्यामुळे 63 कोंबड्यांचा मृत्यू झाला. कोंबड्या बेशुद्ध पडल्यानंतर मालकाने त्यांना जिवंत करण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यानंतर त्याला स्थानिक पशुवैद्यकाने तपासले. मोठ्या आवाजामुळे पक्ष्यांना धक्का बसला, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. तरुण रणजीतने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. नोकरी न मिळाल्याने 2019 मध्ये बँकेकडून कर्ज घेऊन ब्रॉयलर फार्म सुरू केला होता.

दरम्यान या घटनेनंतर त्याने शेजारी असलेल्या रामचंद्र यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली. मात्र त्यांनी नकार दिल्याने रणजितने रामचंद्र यांच्या विरोधात निलगिरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, मोठ्या आवाजात संगीत आणि फटाक्यांमुळे पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. बालासोरचे एसपी सुधांशू मिश्रा यांनी सांगितले की, नीलगिरी पोलिस ठाण्यात या संदर्भात तक्रार आली आहे. मात्र, दोन्ही पक्षांनी पोलिस ठाण्यात परस्पर संमतीने हे प्रकरण मिटवल्याचे पोलिसांनी सांगितले.