अलर्ट : उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात ढगफुटीची शक्यता

आज रात्री व पुढील आठवडय़ात देखील उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि भौगोलिक परिस्थिती नुसार रात्री ढगफुटीची शक्यता असून  उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा ढगफुटींचा आज धोका आहे.  शेतकऱ्यांसह नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. हवामान अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी ही माहिती कळवली आहे.

(फ्लॅशफ्लड) हाय रिस्कचे जिल्हे

नाशिक,
ठाणे,
धुळे,
जळगाव,
अहमदनगर
पुणे,
मुंबई

मराठवाड्यात देखील जोरदार पाऊस. काळजी आवश्यक!

शेतकर्यांनी घाबरून न जाता धैर्याने परिस्थितीचा सामना करावा.  ज्या ठिकाणी पाण्याचा साठा जास्त, बाष्पीभवन वेग जास्त व सुर्य प्रकाश जास्त अशा ठिकाणी पावसाचा धोका आहे किरणकुमार जोहरे यांनी कळवले आहे.