राज्यात मुसळधार, सोयाबीन-कपाशीचे नुकसान; जायकवाडीकडे पाणी झेपावले

मराठवाडा, विदर्भाला झोडपले, अनेकांची शेती पाण्यात ( Heavy rain in Marathwada and Vidarbha)

नाशिक, ता. २८ : गुलाब चक्रीवादळामुळे नाशिक, कोकणसह मुंबईला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. मात्र काल रात्रीपासूनच विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. बीड, वाशिम जिल्ह्यात सोयाबीन आणि कापसाचे पिक पाण्याखाली गेले आहे. तसेच अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील धरण क्षेत्रात काल मध्यरात्रीपासून पाऊस झाल्याने गोदावरीत पुन्हा विसर्ग सुरू असून जायकवाडीकडे हे पाणी झेपावणार आहे.

 

पावसाची क्षणचित्रे

  • औरंगाबाद जिल्ह्यातील  पिशोर गावात नदीला पूर, सिल्लोड तालक्यात पांढरी नदीला पूर.
  • नांदेड जिल्हयातील प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधबा धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.
  • लातूर जिल्हयातील मांजरा धरण भरले असून तब्बल १६ वर्षांनंतर मांजराचे दरवाजे उघडले आहेत.
  • परभणी तालुक्यात मुसळधार पाऊस. गोदेकाठच्या शेतीचे नुकसान
  • वाशिममध्ये पावसामुळे सोयुबीनचे नुकसान. पंचनामे करण्याची मागणी
  • केज तालुक्यात पावसामुळे सोयाबीन आणि कपाशीचे नुकसान
  • जालना जिल्हयातील भोकरदन परिसरात ढगफुटीसदृश पाऊस
  • नाशिक जिल्हयात मध्यरात्रीपासून पुन्हा मुसळधार पाऊस, नांदगाव, बोलठाण, जातेगांवला जोरदार पाऊस.
  • गंगापूर धरणातून पुन्हा विसर्ग सुरू. तसेच नांदूर मध्यमेश्वरमधूनही विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.
  • नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरीचे उघडल्याने गोदावरीला पूर आला आहे.
  • अकोला आणि उस्मानाबाद जिल्हयात पावसाचे थैमान
  • यवतमाळ जिल्हयात पूरात बस वाहून गेली.