संत श्री गुरु नानक यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई दि. ३० –  शीख धर्माचे संस्थापक आणि शिखांचे पहिले गुरू संत श्री गुरु नानक यांची आज जयंती.  त्यानिमित्त मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी त्यांना अभिवादन केले आहे.

मुख्यमंत्री म्हणतात ‘ईश्वर एकच आहे आणि तो चराचरात आहे’ असा संदेश त्यांनी दिला. प्रत्येकाशी सन्मानाने आणि प्रेमपूर्वक आदराने वागण्याची त्यांची  शिकवण आजच्या काळात खूप महत्त्वाची आहे. संत श्री गुरु नानक यांना जयंतीनिमित्त त्रिवार प्रणाम आणि त्यांच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा.

गुरुनानक जयंतीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी गुरुनानक जयंतीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

गुरु नानक देशातील एक महान दार्शनिक संत आणि द्रष्टे समाजसुधारक होते. गुरुनानक यांनी मनुष्यमात्रांची समानता व सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार केला. त्यांची विश्वबंधुत्वाची शिकवण सर्वकालीन प्रासंगिक आहे. गुरु नानक जयंतीच्या मंगल पर्वावर मी राज्यातील सर्व लोकांना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

शीख धर्मसंस्थापकशीख बांधवांचे पहिले गुरूगुरू नानकदेव यांनी जगाला एकतासमताबंधुतामानवतेचा संदेश दिला. समाजातील स्पृश्य-अस्पृश्यताभेदाभेद नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. गुरू नानकदेव यांच्या विचारातच अखिल मानवजातीचे कल्याण सामावले आहेअशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरु नानक जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करून अभिवादन केले.