हरियाणा आणि पंजाबमधल्या शेतकऱ्यांकडून हमीभावाने खरेदी सुरू

हरियाणा आणि पंजाबमधल्या 8059 शेतकऱ्यांकडून 30 सप्टेंबरपर्यंत 1888 प्रती क्विंटल दराने 197 कोटी रुपये एमएसपी मूल्याचा 1,04,417 मेट्रिक टन तांदूळ खरेदी

2020-21खरीप विपणन हंगामाची आवक सुरु झाली असून सरकारने खरीप 2020-21 पिकाची,सध्याच्या किमान आधारभूत किंमतीनुसार आधीच्या हंगामाप्रमाणे, शेतकऱ्यांकडून खरेदी सुरु ठेवली आहे.

खरीप विपणन हंगाम 2020-21 साठी हरियाणा आणि पंजाब मधून तांदूळ खरेदी 26 सप्टेंबर 2020 पासून सुरु झाली. 30.09.2020 पर्यंत हरीयाणामधे  13,412  मेट्रिक टन तर पंजाबमध्ये 91,005 मेट्रिक टन तांदूळ खरेदी झाली असून या दोन राज्यातल्या  8059 शेतकऱ्यांकडून 1888 रुपये प्रती क्विंटल एमएसपी दराने 197 कोटी रुपयांचा एकूण 1,04,417  मेट्रिक टन तांदूळ खरेदी करण्यात आला आहे.

राज्यांकडून आलेल्या प्रस्तावानुसार,   खरीप विपणन हंगामासाठी तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि हरियाणा या राज्यांसाठी  14.09 लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांच्या खरेदीला तर 1.23  लाख मेट्रिक टन खोबरा खरेदीला आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळसाठी मंजुरी देण्यात आली आहे. इतर राज्ये/केंद्र शासित प्रदेशांसाठी डाळी आणि तेलबिया, खोबरे  यासाठी प्रस्ताव आल्यानंतर मंजुरी देण्यात येईल.

29.09.2020पर्यंत केंद्र सरकारने नोडल एजन्सीद्वारे 46.35 मेट्रिक टन मुग खरेदी केली. किमान आधारभूत किंमत 33  लाख रुपये  असलेल्या या मुग खरेदीतून तामिळनाडूतल्या   48  शेतकऱ्यांना लाभ झाला. त्याचप्रमाणे किमान आधारभूत किंमत 52.40 कोटी रुपये असलेल्या  5089 मेट्रिक टन खोबऱ्याची खरेदी करण्यात आली त्याचा कर्नाटक आणि तामिळनाडू मधल्या 3961 शेतकऱ्यांना लाभ झाला. आंध्रप्रदेश, कर्नाटक,तामिळनाडू आणि केरळसाठी 1.23 लाख मेट्रिक टनची मंजुरी देण्यात आली होती.

2020-21 च्या हंगामासाठी कापूस खरेदीला  आजपासून सुरुवात झाली.   भारतीय कापूस महामंडळ एफएक्यू दर्जाच्या कापूस खरेदीला आजपासून सुरवात करत आहे.