Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

द्राक्ष, केळी व ड्रॅगनफ्रुट रोहयो योजनेत समाविष्ट

द्राक्षकेळी व ड्रॅगनफ्रुट या फळांचा रोहयो योजनेत  समावेश करण्यात आला असल्याचे  फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले. श्री. भुमरे  म्हणालेफळबाग लागवडीच्या माध्यमातून पूरक व्यवसायात वाढ करणे व उत्पादन वाढवणे हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजनेचे उद्दिष्ट आहे. या वर्षात फळबाग लागवडीसाठी प्रति कृषि सहायक 10 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे लक्षांक निश्चित करुन दिला असून राज्यात 18235.73 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे.

रब्बी हंगाम 2021 राज्यस्तरीय नियोजन व आढावा बैठक कृषी आयुक्तालयपुणे येथे घेण्यात आलीत्यावेळी कृषीमंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरेकृषी राज्यमंत्री विश्वजीत कदमकृषी आयुक्त धीरज कुमारसचिव एकनाथ डवलेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव बोटेकृषी विभागाचे संचालक व मंत्रालयीन अधिकारीसहसंचालक व कृषी विद्यापीठांचे संशोधन संचालकठाणे, नाशिककोल्हापूरऔरंगाबादलातूरनागपूर व अमरावती जिल्हयाचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारीआत्माचे प्रकल्प संचालक व कृषि आयुक्तालयातील  अधिकारीउपस्थित होते.

बैठकीत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातील अन्नधान्य पिके व गळीतधान्यबियाणे मागणी व उपलब्धता नियोजननवीन वाणांचे बियाणे साखळी नियोजनरासायनिक खते नियोजनपिकांवरील कीड रोग सर्वेक्षणकृषि पायाभूत सुविधा योजनाभाजीपाला क्षेत्र नियोजन व मागणीबाबत धोरणप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनाकृषि व अन्न प्रक्रिया संचालनालय स्थापना आदी विषयांचा आढावा घेण्यात आला.

Exit mobile version