Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

वीजबील वसुलीने घेतला द्राक्ष शेतकर्‍याचा बळी?

अवकाळी पाऊस , वीजबिल तगादा आणि पडलेला बाजारभाव यामुळे द्राक्ष पंढरी असलेल्या खेडगाव येथील शेतकर्‍याचा बळी गेला आहे.

खेडगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी कै बाळासाहेब बाबुराब ठुबे यांनी नुवान हे कीटकनाशक घेऊन शिल्लक असलेल्या द्राक्ष बागेत आपले जीवन संपवले असल्याचे वृत्त दैनिक पुढारीने दिले आहे.

एकूण दिड एकर क्षेत्र असलेले ह्या शेतकऱ्याकडे अजून एक एकर द्राक्ष बाग खुडणे बाकी होते पहिल्या एक बिघे द्राक्ष चा काढणी झाली होती परंतु बाग कमी आलेले असल्याने त्या बागेत द्राक्ष माल खूपच कमी निघाला पुढचा बाग जरा बरा असल्याने त्यात पैसे होतील म्हणून नातेवाईक लोकांकडून उसनवारी करून बैकेचे पैसे भरून पुन्हा रेगुलर करून घेतले होते दरवर्षी बँकेत वेळेवर पैसे भरून आपले कर्ज खाते नियमित रेग्युलर ठेवणारे हे शेतकरी होते.

मागील तीन ते चार दिवसापासून त्यांच्या शिवारातील डीपी ही बंद केली असून ते वीज बिल द्राक्ष बागेचा खुडा बाकी असल्याने थकबाकी भरण्याची परिस्थिती नसल्या कारणाने ते विचारत होते द्राक्ष ची दिवसेंदिवस भाव कमी असल्याने लोकांकडून घेतलेले पैसे कसे परत करायचे ह्याही विवनचनेत ते होते.

त्यात काल झालेला अवकाळी पाऊस त्यांच्या चिंतेत वाढ झाली ह्या सगळ्या गोष्टींचा शेवट म्हणून त्यांनी सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान त्यांची पत्नी कोथबीर विकण्यासाठी गावात गेलेली असताना घरातून विषारी औषधाची बाटली घेऊन द्राक्ष बागेत जाऊन ते औषध घेतले काही वेळातच त्यांच्या पत्नी घरी आल्या असता त्यांचा मोबाईल व डायरी घरात दिसली म्हणून त्या आवाज देत देत समोर असलेल्या बागेत गेले असता तेथे बेशुद्ध अवस्थेत दिसले असता शेजारच्या नागरिकांनी तात्काळ पिंपळगाव येथील खाजगी दवाखान्यात नेले असता उपचारा दरम्यान मध्यरात्री 2 वाजेच्या दरम्यान त्यांची प्राण ज्योत मावळली.

त्यांच्या पश्चात एकच लग्न झालेली मुलगी व पत्नी असा छोटा परिवार आहे. ह्या शेतकऱ्यास शासकीय सर्वोत्तपरी मदत मिळावी व तसेच सध्या सरकारने व वीज मंडळाने सुरू केलेली वीज थकबाकी वसुली मोहीम त्वरित थांबवावी व द्राक्ष दर ह्या वर्षी कमी उत्पादन असतानाही का पडले ह्याचीही चौकशी व्हावी अशी मागणी खेडगाव परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.

Exit mobile version