खरिपातील धान्य, डाळी, कापसाची हमीभावाने खरेदी सुरू

खरीप विपणन हंगाम 2020-21 साठी तांदूळ खरेदी प्रक्रिया सुरळीत सुरु, 09 ऑक्टोबरपर्यंत 6065.09 कोटी रुपयांच्या 32,12,439 मेट्रीक टन तांदळाची 2.83 लाख शेतकऱ्यांकडून खरेदी

खरीप विपणन हंगाम 2020-21 सुरु झाला असून सरकारने शेतकऱ्यांकडून मागील हंगामाप्रमाणेच किमान आधारभूत किंमतीने खरेदी केली आहे. खरीप विपणन हंगाम 2020-21 साठी तांदळाची खरेदी प्रक्रिया सुरळीत सुरु आहे. 09 ऑक्टोबरपर्यंत 2.83 लाख शेतकऱ्यांकडून 6065.09 कोटी रुपयांचा 32,12,439 मेट्रीक टन तांदूळ खरेदी केला आहे. तसेच, राज्यांकडून आलेल्या प्रस्तावांनुसार, 30.70 लाख मेट्रीक टन डाळी आणि तेलबियांची तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, ओदिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांत खरेदीला मंजूरी दिली आहे. याव्यतिरिक्त, 1.23 लाख मेट्रीक टन सुक्या खोबऱ्याच्या खरेदीसाठी आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ राज्यांना मंजूरी दिली आहे.

इतर राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत डाळी, तेलबिया आणि सुके खोबऱ्याच्या खरेदीचे प्रस्ताव प्राप्त झाल्यावर मान्यता दिली जाईल जेणेकरून या पिकांच्या एफएक्यू ग्रेडची खरेदी सन 2020-21 च्या अधिसूचित एमएसपीवर थेट शेतकऱ्यांकडून करता येईल, परंतु  राज्यांनी मंजूरी दिलेल्या खरेदी संस्थांमार्फत केंद्रीय नोडल एजन्सीजद्वारे संबंधित राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील अधिसूचित काढणीच्या कालावधीत बाजार दर एमएसपीच्या खाली असेल तर हे शक्य आहे.

शेतकऱ्यांना लाभ

09 ऑक्टोबरपर्यंत, नोडल संस्थांमार्फत सरकारने 3.33 कोटी रुपयांचा 459.60 मेट्रीक टन मूग खरेदी केला आहे, ज्याचा तामिळनाडू आणि हरियाणातील 326 शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. तसेच 52.40 कोटी रुपयांचे 5089 मेट्रीक टन सुके खोबरे खरेदी केले आहे, ज्याचा कर्नाटक आणि तामिळनाडूतील 3961 शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. सुके खोबरे आणि उडदाच्या बाबतीत मुख्य उत्पादक राज्यांमधील दर किमान आधारभूत किंमतीपेक्षा अधिक आहेत. मूग व इतर खरीप कडधान्ये आणि तेलबिया यांच्या संदर्भात बाजारात येणाच्या तारखेच्या आधारे संबंधित राज्यांनी ठरविलेल्या तारखेपासून संबंधित राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकार निश्चित तारखेला प्रारंभ करण्याकरिता आवश्यक व्यवस्था करीत आहेत.

2020-21 खरीप विपणन हंगामासाठी 1 ऑक्टोबरपासूनच कापूस खरेदी प्रक्रिया सुरु झाली आहे. 9 ऑक्टोबरपर्यंत कापूस महासंघाकडून 22339 गाठी कापूस किमान आधारभूत किंमतीत 6451.73 लाख रुपयांना खरेदी केला आहे, ज्याचा 4286 शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.