‘गुगल पे’ चे सर्व्हर होते दोन तास डाउन

रविवारी अचानक UPI पेमेंट सर्व्हरमध्ये काही समस्या आली ज्यामुळे UPI पेमेंट सेवा जवळपास 2 तास विस्कळीत झाली. PhonePe आणि Google Pay वापरकर्ते काल ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करू शकले नाहीत.

यूपीआयमध्ये खरोखर काही समस्या आहे का किंवा त्यांच्या बाजूने ही समस्या होती का, असा प्रश्न अनेक वापरकर्त्यांना पडला होता. काही वापरकर्त्यांनी त्यांच्या अयशस्वी UPI व्यवहारांचे स्क्रीनशॉट देखील सोशल मीडियावर पोस्ट केले.

अशाच एका वापरकर्त्याने सांगितले की, तो काही तासांपासून Google Pay द्वारे पेमेंट करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु ते होऊ शकले नाही.

त्रस्त युजर Twiiter वर
गुगल पेचे वापरकर्ते दोन तासांपेक्षा जास्त काळ UPI सेवा बंद झाल्याची तक्रार करत होते. आणखी एका वापरकर्त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटद्वारे दुपारी 1:13 वाजता तक्रार केली की तो Google Pay द्वारे पेमेंट प्राप्त करू शकत नाही. मात्र, 4 तासांहून अधिक काळ लोटूनही समस्या सुटत नसल्याचे त्याच युजरने उत्तर दिले.
आणखी एक ट्विटरधारकाने दुपारी 3:02 वाजता हीच समस्या नोंदवली. ज्याला Google Pay ने संध्याकाळी 5:10 च्या सुमारास प्रतिसाद दिला.

UPI द्वारे मोठे व्यवहार
नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, UPI ने डिसेंबर २०२१ मध्ये एकूण रु. ४५६ कोटी व्यवहार नोंदवले. ही 2020 च्या तुलनेत 110% पेक्षा जास्त वाढ होती. डिसेंबर 2021 मध्ये PhonePe रु. 3.94 लाख कोटी व्यवहारांसह UPI व्यवहारांत अग्रणी होते. त्या खालोखाल Google Pay ने रु. 3.03 लाख कोटींच्या एकूण व्यवहारांसह दुसरे स्थान कायम राखले. Paytm रु. 88,094 कोटी व्यवहारांसह तिसर्‍या क्रमांकावर आहे. Amazon Pay रु. 6,641 कोटी व्यवहारांसह चौथ्या क्रमांकावर आहे. , त्यानंतर 188 कोटी रुपयांच्या व्यवहारासह WhatsApp Pay पाचव्या स्थानावर आहे.