लग्नसराईमध्ये सोने झाले स्वस्त; 1500 रुपयांनी घसरले

तीन दिवसांत सोन्याचा भाव 1500 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरला यावर कदाचित विश्वास बसणार नाही. चांदीचा भाव मात्र 680 रुपयांवर स्थिर आहे. मागील ऑगस्टमध्ये सोने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचले होते. सध्या ते 48,076 वर आहे. पुण्यात आज २२ कॅरेट सोन्याचे दर 46,190 तर २४ कॅरेट सोन्याचे दर ₹49,440 असे होते. सोने घसरले असले तरी पुन्हा त्याचे दर वाढत राहणार आहेत, असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात. भविष्यात सोने पुन्हा ५४ हजाराच्या जवळपास जाऊ शकते. त्यामुळे आज केलेली खरेदी ही भविष्यासाठी गुंतवणूक ठरेल.

21 नोव्हेंबरला 24 कॅरेट सोन्याचा भाव 200 आणि 22 कॅरेट 100 रुपयांनी कमी झाला. 23 नोव्हेंबरला त्यात एकवेळ 800 रुपयांची घसरण झाली. चांदीचा भावही 10 ते 700 रुपयांनी घसरला होता. यानंतर 23 नोव्हेंबरला 400 आणि 24 नोव्हेंबरला एकरकमी 800 रुपयांची घसरण झाली.

तिसऱ्या दिवशी 25 नोव्हेंबरला सोन्याचा भाव पुन्हा 300 रुपयांनी घसरला. यापूर्वी धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याचा भाव 300 रुपयांनी वधारला होता, तर तिसऱ्या दिवशी 200 रुपयांनी घसरला होता. यापूर्वी 7 नोव्हेंबरला सोन्याचा भाव 300 रुपयांनी वाढला होता. चांदीचा भाव 700 रुपयांवर स्थिर राहिला. कोरोनाच्या काळात झारखंड सरकारच्या शिथिलतेनंतर जूनच्या मध्यापासून सोन्या-चांदीची दुकाने उघडण्यात आली, तेव्हा भाव गगनाला भिडू लागले. दर दिवसेंदिवस वाढत होते.