Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

बाजरी संशोधनाबद्दल औरंगाबादच्या संशोधन प्रकल्पाचा गौरव

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील राष्‍ट्रीय कृषी संशोधन प्रकल्‍पातील अखिल भारतीय बाजारी संशोधन प्रकल्‍पास वर्ष २०२१ – २२ करीता संशोधन व बीजोत्पादनच्‍या कार्याबद्दल उत्‍कृष्‍ट कार्य म्‍हणुन प्रशस्‍तीपत्र देऊन गौरविण्‍यात आले. दिनांक २ व ३ मार्च रोजी मध्‍यप्रदेश, गुजरात, महाराष्‍ट्र, आंध्रप्रदेश व तामिळनाडु राज्‍यातील बाजरा संशोधन प्रकल्‍पांची ऑनलाईन ५७ वी वार्षिक संशोधन बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते, या बैठकीत हा गौरव करण्‍यात आला. बैठकीस नवी दिल्ली येथीज भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा,  उपमहासंचालक डॉ  टी आर शर्मा, सहाय्यक संचालक डॉ आर के सिंग, जोधपुर येथील अखिल भारतीय बाजरा सुधार समन्‍वयीत प्रकल्पाच्‍या प्रकल्‍प समन्वयक डॉ तारा सत्यवती आदींची प्रमुख उपस्थिती होती. सदरिल बैठकीत संशोधन व बीजोत्‍पादन कामाचा आढावा घेण्‍यात त्‍या आधारे उत्‍कृष्‍ट कार्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्‍यात आले. या पुरस्काराबद्दल कुलगुरू मा डॉ अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. 

या संशोधन प्रकल्‍पातील सहयोगी संचालक संशोधन डॉ सूर्यकांत पवार, बाजरा पिक रोग शास्त्रज्ञ डॉ गजेंद्र जगताप, बाजरा पैदासकार डॉ. भदर्गे, डॉ. आशिष बागडे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. एन आर पतंगे, वरीष्ठ संशोधक श्रीमती आशा झोटे, श्री कुंदे,  श्री ठोंबरे,  श्री लगाने, श्री माने आदी शास्‍त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांचे योगदान लाभले. बीजोउत्पादन कार्य करता डॉ के एस बेग, डॉ एस बी घुगे, डॉ अमोल मिसाळ यांचे योगदान लाभले. 

सदरिल संशोधन केंद्राने अखिल भारतीय बाजारा प्रकल्प जोधपुर व इक्रिसॅट संस्था हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने अधिकतम लोह व जस्त असणाऱ्या संकरित वाण एएचबी-१२०० व एएचबी-१२६९  या जैवसंपृक्त संकरित वाणाची राष्ट्रीय स्तरावर प्रसारित करण्यात आला. तसेच या वाणाचे बीजोत्पादन घेऊन शेतकरी बांधवापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. विविध कार्यक्रमाद्वारे बाजरी पिकाबाबत जनजागृतीचे कार्य केले. सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे होणार असल्याने त्यादृष्टीने  बीजोत्पादनाचा कार्यक्रम हाती घेण्‍यात आला आहे.

Exit mobile version