यंदा अनेक ठिकाणी साधेपणाने शारीरिक अंतर पाळून गणरायाला निरोप देण्यात आला. मुंबईसह अनेक शहरात मिरवणूक आणि उत्साह पहायला मिळाला नाही.
पुण्याच्या इतिहासात मिरवणूक नाही
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा इतिहासात गणपती विसर्जन मिरवणूक निघाली नाही. त्यामुळे दरवर्षी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठीच्या गणेश भक्तांच्या जल्लोषावर यंदा विरजण पडले.
मानाचे पाच गणपती आणि प्रमुख मंडळांनी यंदा गणेशोत्सव साजरा केला आणि गणपती विसर्जनही कोरोनाच्या पार्शभूमीवर आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करीत उत्सव मंडपातील कृत्रिम तलावांमध्ये केले.
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात पुण्यातील मानाच्या पाचही गणपती मंडळांच्या श्रींचे विसर्जन दुपारी दीड वाजेपर्यंत झाले.
मानाचा पहिला कसबा गणपती, मानाचा दूसरा तांबडी जोगेश्वरी गणपती,मानाचा तिसरा गुरूजी तालिम मंडळाचा गणपती, मानाचा चौथा तुळशीबाग गणपती आणि मानाचा पाचवा केसरीवाड्याच्या श्रींच्या मूर्तीचे विसर्जन कृत्रिम हौदातील पाण्यात करण्यात आले. मंडपाच्या ठिकाणीच हौदांची व्यवस्था करण्यात आली होती.
गर्दीवर मर्यादा असली तरी, परंपरा आणि धार्मिक विधी याचे पालन करीत आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी या’चा जल्लोष करीत आपल्या लाडक्या गणरायाला गणेशभक्तांनी निरोप दिला.
नाशिकमध्ये पर्यावरणपूरक विसर्जन
कोविड-19 चा नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रादुर्भाव बघता या वर्षाचा सार्वजनिक गणेशोत्सव सन 2020 हा पर्यावरण पुरक तथा नागरीकांमध्ये फिजिकल डिस्टनसिंग ची खबरदारी लक्षात घेता या वर्षीचा गणेश उत्सव साजरा करण्यात आलेला आहे.
सन 2020 श्रीगणेश उत्सव हा पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा व्हावा अशी नाशिक महानगरपालिकेची धारणा आहे. त्यामुळे समस्त गणेश भक्तांना आवाहन करण्यात आलेले होते.
त्या पार्श्वभुमीवर श्रीगणेश मुर्ती संकलनासाठी अनेक स्वयंसेवकांचे शेकडो हात “गणेशोत्सव 2020”च्या श्रीमुर्ती संकलनासाठी लागले असून अनेक स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.
या वर्षीचा गणेशोत्सव 2020 हा “मिशन विघ्नहर्ता” म्हणून साजरा करीत असून 18 पेक्षा अधिक स्वयंसेवी संस्थाच्या संयुक्त विद्यामानाने या वर्षाचा गणेशोत्सव पर्यावरणपुरक साजरा करण्यात आलेला आहे.
वर्षावर पर्यावरणपूरक विसर्जन
वर्षा निवासस्थानी आज सायंकाळी श्री गणेश विसर्जन करण्यात आले. निवासस्थान परिसरात खास तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हौदात श्रीगणेश मूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात आले. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी श्रीमती रश्मी, मंत्री आदित्य तसेच तेजस ठाकरे यांनी श्री गणेशाची पूजा केली.
अकोल्यात बाप्पाला भक्तिभावाने अखेरचा निरोप
गेल्या दहा दिवसांपासून लाडक्या गणपतीची पूजाअर्चा करून आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी भाविक सज्ज झाले होते. तर मानाचा बारभाई गणपतीचे विसर्जन ही घरीच करण्यात आले. यावेळी विविध गणपती मंडळाचे पदाधिकारी व काही लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती होती. आरती करीत गणपती विसर्जित करण्यात आला.
भक्तांनी गणेशाला दहा दिवसांच्या पूजनानंतर निरोप दिला. महापालिका प्रशासन तसेच सामाजिक संघटना आणि नगरसेवकांनी आपापल्या परिसरामध्ये, प्रभागांमध्ये गणेश विसर्जनासाठी कृत्रिम घाट तयार केले होते. या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी गणेशाचे नागरिकांनी गणेशाचे परिसरातील नागरिकांनी गणेशाचे नागरिकांनी गणेशाचे विसर्जन केले. तसेच मोर्णा नदीच्या काठी असलेल्या मुख्य गणेश घाटावर भक्तांनी गणेशाला विसर्जित केले. या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. तसेच महापालिका प्रशासनाकडून विसर्जित झालेल्या गणपतीचे एकत्रीकरण करीत ते पूर्णा नदीत विसर्जित करण्यात पूर्णा नदीत विसर्जित करण्यात येत होते.
उपमुख्यमंत्र्यांनी मानले सर्व गणेशभक्तांचे, गणेशमंडळांचे जाहीर आभार
अनंत चतुर्दशीनिमित्त श्रीगणरायांना निरोप देत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “विघ्नहर्ता श्रीगणराया जगावरचं कोरोना संकट दूर कर. सर्वांना सुखी ठेव. सर्वांना उत्तम आरोग्य दे. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या घरात सुबत्ता येऊ दे. महाराष्ट्राला आर्थिक संकटातून बाहेर काढून पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर नेण्याचं बळ आम्हा सर्वांना दे…” असं साकडं घातलं आहे. यंदा गणेशोत्सव साधेपणानं, नियमांचं पालन करीत, कोरोनासंसर्ग वाढणार नाही याची काळजी घेत शिस्तबद्ध पद्धतीनं साजरा केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी गणेशभक्तांचे आभार मानले आहेत.