Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

गडकरी यांनी पालखी मार्गांच्या कामाचा आढावा घेतला

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग प्रकल्प तसेच पुणे विभागातील  रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण यांच्या प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आज पुण्यात आढावा घेतला. या बैठकीला पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

   

श्री गडकरी यांनी दोन्ही पालखी मार्गाचा आढावा घेऊन तातडीने काम मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या तसेच पुण्यात राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने सुरु असणा-या  रस्त्याच्या कामांसाठी आवश्यक बाबींची तातडीने पूर्तता करण्याचे  निर्देशही श्री. गडकरी यांनी यावेळी दिले.

Exit mobile version